Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

बंटी पवार टोळीवर ‘मोक्का’ नुसार कारवाईचे आदेश

खुन, खुनाचा प्रयत्न, खंडणी, दहशत माजविणे, अपहरण, बलात्कार असे विविध गुन्हे दाखल असलेल्या आणि सिंहगड रोड परिसरात दहशत माजविणा-या बंटी पवार टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले.

तिघांवर होणार कारवाई

महेश उर्फ बंटी प्रकाश पवार (वय ३६), शुभम बबन वाघमारे (वय २६), प्रवीण बाळासाहेब ढाकणे (वय १९, तिघे रा. वडगाव बुद्रुक) अशी कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

२०१५ मध्य बंटी पवार आणि त्यांच्या साथीदारांवर मोक्का कारवाई केली होती. त्यानंतर तो जुलै २०१९ मध्ये जामीन मिळवून बाहेर आला होता. त्यानंतर त्याने पुन्हा दोन खुनाचे प्रयत्न केले व पसार झाला.

Advertisement

पोलिसांनी ऑगस्ट २०१९ मध्ये त्याला अटक करून येरवडा कारागृहात रवानगी केली; परंतु कोरोनाच्या प्रार्दुभावाचा गैरफायदा घेत तो जामीनावर पुन्हा बाहेर आला.

मोक्कानुसार कारवाईस मंजुरी

२० जून २१ रोजी बंटी पवार व साथीदार शुभम वाघमारे यांना ५ लाख रुपयांचा गांजासह अटक करण्यात आली. तपासात पवारचा साथीदार ढाकणे याच्याकडून अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते.

बंटी पवार आणि साथीदारांविरोधात मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव सिंहगड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देवीदास घेवारे यांनी परिमंडळ तीनच्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांच्याकडे सादर केला. अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी या प्रस्तावास नुकतीच मंजूर दिली.

Advertisement

 

Leave a comment