Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

जंगलभ्रंमतीसाठी आल्यास कारवाई

भीमाशंकर: कोरोनामुळे लागू केलेले निर्बंध हळूहळू शिथील होत असले, तरी अजून पर्यटनास परवानगी नाही, तरीही नागरिक मोठ्या संख्येनं गर्दी करीत आहेत.

नाकाबंदी, दंड करूनही पर्यटक जुमानायला तयार नाहीत. त्यामुळं आता कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा देण्यात आला आहे.

काय म्हटले वन्यजीव विभागाने?

महाराष्ट्र शासनाने कोणत्याही प्रकारच्या पर्यटनास परवानगी दिलेली नाही, तरी भीमाशंकरकडे येणा-या पर्यटकांनी अभयारण्यातील धबधबे, कोकणकडे, निसर्गपायवाटा, जंगल भ्रमंती यासाठी येवू नये.

जंगलात विना परवानगी कोणी फिरताना आढळून आल्यास त्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. असा इशारा वन्यजीव विभागाचे सहाय्यक वनसरंक्षक दिलीप भुर्के यांनी दिला आहे.

पर्यटकांचा जीव धोक्यात

राज्य शासनाने कोरोना निर्बंधात थोडी सूट दिल्याबरोबर लोक मोठया संख्येने घरातून बाहेर पडू लागले आहेत. सध्या पावसाळा सुरू झाल्याने पर्यटन स्थळांकडे मोठया संख्येने जात आहेत.

शासनाने पर्यटनस्थळे धार्मिकस्थळे घडण्यास परवानगी दिलेली नाही, तरीही लोक भीमाशंकर, माळशेज, हरिश्चंद्र गड, लोणावळा खंडाळा, ताम्हीणी घाट, माथेरान, महाबळेश्वर या ठिकाणी वर्षा विहारासाठी जातात.

अशा पर्यटकांच्या लोंढेच्या लोंढे या ठिकाणी दिसू लागले आहेत. यातून कोरोना महामारीचा धोका आहेच तसेच या पर्यटनस्थळांवर धोकादायक पद्धतीने फिरून लोक आपला जीव धोक्यात घालत आहेत.

धबधब्यातून पडलेला तरुण अजूनही बेपत्ता

नगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील वाकडी येथील लक्ष्मण लहारे हा २९ वर्षाचा युवक आपल्या मित्रांसोबत भीमाशंकर जंगलात फिरायला गेला.

कोणताही अंदाज नसताना कोंढवळच्या धबधब्यात उतरला व पाय घासरून पडला. या घटनेला सहा दिवस झाले, तरी त्याचा पत्ता लागलेला नाही.

त्याला शोधण्यासाठी एनडिआरएफ, पोलिस, वन विभाग, स्थानिक ग्रामस्थ व इतर काही सेवाभावी संस्था यांनी भरपुर प्रयत्न केले; मात्र त्याचा अजूनही तपास लागला नाही.

Leave a comment