पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या काळात प्रक्षाेभक भाषण प्रकरणात काेलकाता पाेलिसांनी अभिनेता व भाजप नेते मिथुन चक्रवर्ती यांची बुधवारी चाैकशी केली.

व्हर्च्युअल चाैकशी :-

चक्रवर्ती पुण्यात आहेत. त्यामुळे त्यांची व्हर्च्युअल माध्यमातून सकाळी १० वाजून २० मिनिटांनी चाैकशी सुरू झाली, ती दुपारपर्यंत चालली.

न्यायालयात याचिका :-

मिथुन यांच्याविराेधात काेलकाताच्या मानिकताला ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला हाेता. हा एफआयआर रद्द करण्यासाठी मिथुन यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली हाेती.

चाैकशी करण्याचे आदेश :-

हायकाेर्टाने पाेलिसांना मिथुन यांची चाैकशी करण्याचे आदेश दिले हाेते.

विधानसभा निवडणुकीपूर्वी ७ मार्च राेजी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या उपस्थितीत ते भाजपमध्ये सहभागी झाले हाेते.

त्यानंतर त्यांनी ममता बॅनर्जी व तृणमूल सरकारच्या विराेधात कडक भूमिका दाखवून दिली हाेती.

हे प्रक्षोभक विधान नडले :

‘मैं एक नंबर का कोब्रा हूँ.. डसूंगा तो तुम फोटो बन जाआेगे’ अशा प्रकारची टिप्पणी त्यांनी फिल्मी संवादातून केली होती.

त्यावर तृणमूलने हे प्रक्षोभक विधान असल्याचा आरोप करून एफआयआर दाखल केला होता. या विधानामुळे निवडणुकीनंतर हिंसाचार भडकण्याची शक्यता तृणमूलने व्यक्त केली होती.

तृणमूलचा आक्रमक पवित्रा :-

दरम्यान पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या काळात राजकीय विरोध, सभा, दोन पक्षांतील संघर्ष असे चित्र पाहायला मिळाले होते.

त्यातून तृणमूलचा पवित्रा जास्त आक्रमक होता. त्याच काळात मिथुन यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता.