Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

अभिनेत्री कविता कौशिक देणार योगाचे धडे

निरोगी राहण्याच्या मार्गांपैकी एक महत्त्वाचा मार्ग म्हणजे शारिरीक तणाव दूर करणा-या क्रिया करणे. संयुक्त राष्ट्राच्या महासभेने २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केल्यापासून दैनंदिन जीवनात योगाच्या महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी जगभरात हा दिवस साजरा केला जातो.

या वर्षी जेएल (जल्दी लाइव्ह) स्ट्रीम आणि लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री कविता कौशिक, जिला सिटकॉम एफआयआरमधील चंद्रमुखी चौटाला म्हणून ओळखले जाते, जेएल अॅपद्वारे एक लाइव्ह योग सत्र आयोजित करणार आहेत.

कविता कौशिक ही प्रत्येकासाठी फिटनेसची प्रेरणा आहे. या सत्राद्वारे ती तिचे कौशल्य आणि अनुभव शेअर करेल.

आंतरराष्ट्रीय योग दिनासह जेएल स्ट्रीम जागतिक संगीत दिन साजरा करण्यासाठी ही सज्ज झाले आहे. ‘फेटे दि ला म्युझिक’ यालाच जागतिक संगीत दिन असेही म्हणतात. हौशी आणि अस्सल संगीतकारांचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

या वर्षी #जेएलम्युझिकलमेलोडीसह, या ब्रँडने वेगळ्या प्रकारे स्ट्रीमर्सना स्वरांसोबत डोलण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. जेएल स्ट्रीमर्ससाठी चांगली बाब म्हणजे, त्यांचा कंटेंट ब्रॉडकास्ट केला जाईल.

जास्तीत जास्त युनिक सेंडर्सच्या माध्यमातून ब्रँड आयोजकाला बक्षीस म्हणून किमान ३००० कॉइन्सच्या माध्यमातून पुरस्कृत करेल. त्यामुळे या विकेंडला संध्याकाळी ७ ते ११ दरम्यान, स्ट्रीमर्स त्यांच्या आतील शकीराला मार्गस्थ करू शकतात आणि आवडत्या संगीत ट्यूनवर गाणे गाऊ शकतात, डान्स करू शकतात, रॅप किंवा रिक्रिएट करू शकतात.

जेएल स्ट्रीम, मेड-इन-इंडिया स्टार्टअप, जानेवारी २०२१ मध्ये लाँड झाले. ऑनलाइन कंटेंट क्रिएटर्समध्ये तो आधीच लोकप्रिय ठरला आहे. ५००,००० पेक्षा जास्त डाऊनलोड्स आणि १००,००० अमेरिकी डॉलर्सपेक्षा मासिक महसूलासह, हे अॅप सोशल मीडिया लाइव्ह अॅप क्षेत्रात एक आदर्श प्रस्थापित करत आहे.

Leave a comment