अभिनेत्री शर्लिन हिने अटकपूर्व जामिनासाठी दाखल केलेला अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. उद्योजक आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राशी संबंधित हे प्रकरण आहे.

लैंगिक जबरदस्ती केल्याचा आरोप

मुंबई गुन्हे विभागाच्या संपत्ती शाखेकडे शर्लिनने आपला जबाब नोंदवला आहे. तिने एप्रिल २०२१ मध्ये राज कुंद्राविरोधात लैंगिक जबरदस्ती केल्याचा आरोप केला होता.

तिने त्याच्याविरोधात फिर्याद दिली होती. सध्या सुरू असलेल्या पॉर्नोग्राफी रॅकेट प्रकरणाच्या चौकशीत आपल्यालाही अटक होऊ शकते, अशी भीती तिच्या मनात आहे.

Advertisement

राज कुंद्राने जबरदस्तीने चुंबन घेण्याचा केला प्रयत्न

२०१९ च्या सुरुवातीला आमच्यात बिझनेस मीटिंग झाली. त्यानंतर २७ मार्च २०१९ रोजी राज कुंद्रा अचानक तिच्या घरी येऊन धडकला. एका टेक्स मेसेजवरुन त्यांच्यात वाद झाला होता.

राज कुंद्राने जबरदस्ती माझे चुंबन घेण्यास सुरुवात केली. मी त्याला विरोध करत होते. मला विवाहित पुरुषामध्ये अडकायचे नाही, हे मी राजला स्पष्टपणे सांगितले.

त्यावर राजने पत्नी शिल्पा शेट्टीसोबत आपले संबंध बिघडल्याचे उत्तर दिले. शर्लिनने तिच्या तक्रारीत हे सर्व नमूद केले आहे.

Advertisement

शिल्पा शेट्टीचीही चौकशी

राज कुंद्राला मुंबई पोलिसांनी १९ जुलैला अटक केली. त्यानंतर पोलिसांनी राज कुंद्राच्या जुहू येथील बंगल्यावर छापा मारला. शिल्पा शेट्टीचीही पोलिसांनी चौकशी केली. त्यावेळी तिने आपला नवरा पॉर्न कंटेट निर्मितीमध्ये सहभागी नसल्याचे सांगितले.

पॉर्न आणि कामुक साहित्यामध्ये फरक असल्याचे तिने पोलिसांना सांगितले. राज कुंद्रावर पॉर्नची निर्मिती आणि वितरणाचा आरोप आहे.

 

Advertisement