पुणे – जगभरात गेल्या दोन वर्षापासून करोनाने (corona) अक्षरशः थैमान घातला होता. करोना विषाणूच्या आजारामुळे अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. दरम्यान, आता करोना रुग्णसंख्येचा आलेख पूर्णपणे खाली आला असून, गुढीपाडव्यापासून (Gudi Padwa) राज्यातील करोनाचे (corona rules) सर्व निर्बंध मागे घेण्यात आले आहे. दरम्यान, कराेनाची लाट संपली अन् नागरिकांमध्ये लसीकरण आणि बूस्टर डाेसबाबत उदासीनता आली. त्यामुळे कराेना प्रतिबंधक लसीचे उत्पादन देखील थांबविण्यात आले. अशी माहिती सिरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला (Serum Institute Adar Poonawala) यांनी दिली. ते पुण्यात एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बाेलत हाेते.

यावेळी अदर पुनावाला म्हणाले, “लोकांना आणि मलाही आता करोना महासाथीचा कंटाळा आला आहे. आम्ही डिसेंबर 2021 मध्ये कोव्हिशिल्ड कराेना प्रतिबंधक (Vaccine Dose) लसीचे उत्पादन थांबवले. तरीही कोव्हिशिल्ड लसीचे 10 कोटी डोस कालबाह्य झाल्याने वाया गेले, अशी माहिती अदर पुनावाला यांनी यावेळी दिली.

ते पुढे म्हणाले, आम्ही स्वाइन फ्लूच्या सुरुवातीलाच फ्लूवरील लस तयार केली हाेती. परंतु, त्याला प्रतिसाद मिळाला नाही. आपल्याकडे फ्लू म्हणजे किरकाेळ समजला जाताे.

त्यासाठी भारतात फ्लू लसीकरणाची गरज वाटत नाही. दरवर्षी किंवा दर दोन वर्षांनी करोना आणि फ्लूची लस नियमितपणे घ्यावे लागेल. असं देखील ते (Adar Poonawala) म्हणाले.

तसेच, वर्धकमात्रेच्या मिश्रणाबाबत धोरणही जाहीर होऊ शकेल. जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिल्यास भारतीय नियामक संस्थांकडूनही मान्यता मिळेल.

मात्र सध्या वर्धक मात्रांना अजिबात मागणी नाही. लस घेण्याबाबत सार्वत्रिक उदासीनता आहे. स्पष्टपणे सांगायचे झाल्यास आता लोकांना करोना महासाथीचा कंटाळा आला आहे आणि मलाही कंटाळा आला आहे. असं त्यांनी यावेळी नमूद केलं.