पुणे – सिरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख आदर पुरावाला (serum institute head adar poonawala) यांना एक कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या चार जणांना बंडगार्डन पोलिसांनी (Police) बिहार राज्यातून ताब्यात घेतले. अदर पुनावाला (adar poonawala) यांचा फोन नंबर हॅक करुन एक कोटी रुपयांची फसवणूक करण्याचा आरोप यांच्यावर होता. पुण्यातील बंडगार्डन पोलिसांनी ही कारवाई (crime) करण्यात आलीय.

आरोपींनी अदर पुनावाला (adar poonawala) यांचा मोबाईल क्रमांक हॅक करून बनावट संदेश तयार केला होता. तो संदेश सिरम इन्स्टिट्यूटच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवून त्यांच्या विविध खात्यात पैसे पाठवण्यास सांगितले होते.

राजीवकुमार शिवाजी प्रसाद, चंद्रभूषण आनंद सिंग,कन्हैया कुमार संभो महतो आणि रवींद्र कुमार हुबनाथ पटेल अशी आरोपींची (crime) नावे आहेत.

आदर पुनावाला यांचा मोबाइल क्रमांक हॅक करून चोरट्यांनी बनावट संदेश तयार करून आरोपींनी अशा प्रकारे तब्बल एक कोटी एक लाख रुपयांची फसवणूक केली होती. बंडगार्डन पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल होता.

हा प्रकार ७ ते ८ सप्टेंबर दरम्यान घडला आहे. याप्रकरणी सिरम इन्स्टिट्युटचे फायनान्स अधिकारी सागर कित्तुर (वय ४४, रा. कोंढवा) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

सागर कित्तुर हे सिरम इन्स्टिट्युटमध्ये फायनान्स व्यवस्थापक आहेत, तर सतीश देशपांडे हे कंपनीचे संचालक आहेत. आदर पूनावाला हे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. आदर पूनावाला यांच्या नंबरवरून बनावट व्हॉटस अ‍ॅप मेसेज देशपांडे यांना आले.

त्यात काही बँक खात्यांचे नंबर देऊन त्यावर तात्काळ पैसे पाठविण्यास सांगितले. हे मेसेज खरे वाटल्याने कंपनीचे खात्यावरुन विविध बँक खात्यावर एकूण १ कोटी १ लाख १ हजार ५५४ रुपये पाठविण्यात आले.

त्यानंतर कंपनीची फसवणुक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर पोलिसांकडे फिर्याद देण्यात आली. आणि त्यानंतर ही सर्व कारवाई करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या टोळीने देशातील आणखी काही हाय प्रोफाईल व्यक्तींची माहिती घेऊन अशा प्रकारे फसवणूक केल्याचेही पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आले आहे. बंडगार्डन पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.