सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला महिन्याभरानंतर पुण्यात परतले आहेत. खासगी विमानाने अदर पूनावाला दाखल झाले.

गेल्या महिन्याभरापासून जास्त काळ परदेशात असणाऱ्या अदर पूनावाला यांनी सतत धमक्या मिळत असल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली होती. यानंतर त्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्याचं जाहीर केले होते.

भारतात एकीकडे मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम सुरु असताना दुसरीकडे सिरमच्या कोव्हिशिल्ड लसीला मोठी मागणी आहे. देशात कोरोना लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने गोंधळाचं वातावरण मे महिन्यात अदर पूनावाला लंडनला निघून गेले होते.

Advertisement

उद्योगानिमित्त लंडनला जात असून तेथील काम संपल्यानंतर परतणार असल्याचं अदर पुनावाला यांनी सांगितले होते.

सिरम लंडनमध्येही आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहे.सिरम कोव्हिशिल्ड लसीचं उत्पादन करत आहे. आतापर्यंत सर्वाधिक वापर झालेल्या लसींमध्ये तिचा समावेश आहे.

ऑगस्ट ते डिसेंबरदरम्यान सिरम केंद्र सरकारला जवळपास ५० कोटी लसींचे डोस पुरवणार आहे. ट्विट करत दिली होती भारतात परत येणार असल्याची माहिती
अदर पूनावाला यांनी ट्विट करत ब्रिटनमध्ये भागीदार आणि भागधारकांसोबत चांगली बैठक झाल्याचं सांगितलं होतं. तसंच पुण्यात कोव्हिशिल्डचं उत्पाहन वेगाने सुरु असल्याची माहिती दिली होती.

Advertisement

सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी आपल्याला मुख्यमंत्री ते उद्योजक अशा अनेकांकडून धमक्या मिळत असल्याचा खुलासा केल्याने देशात सध्या खळबळ माजली होती. अदर पुनावाला यांनी ‘द टाईम्स’ या युनायटेड किंग्डममधील वृत्तपत्राला मुलाखत दिली होती.

कोविशिल्ड लसीसाठी आपल्याला देशातील काही बड्या व्यक्तींचे फोन येत आहेत. यामध्ये काही राज्यांचे मुख्यमंत्री व उद्योगपतींचाही समावेश आहे, असं पूनावाला यांनी म्हटलं होतं. मागील काही दिवसांमध्ये काही प्रभावी व्यक्तींचे मला फोन येऊन गेले.

ज्यामध्ये काही राज्यांचे मुख्यमंत्री व उद्योगपतींचा समावेश आहे, त्यांच्याकडून वारंवार फोन येत आहेत. आम्हालाच लस लवकर हवी आहे, असं म्हणत त्यांच्याकडून दबाव आणला जात आहे,असा खुलासा पुनावाला यांनी केला होता.

Advertisement