मुंबई – अभिनेता प्रभास (prabhas) आणि अभिनेत्री क्रिती सेनन (kriti sanon) यांच्या बहुचर्चित ‘आदिपुरुष’ (Adipurush Controversy) या चित्रपटाचा टीझर समोर आल्यापासून या चित्रपटाची बरीच चर्चा होत आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाची बरीच चर्चा रंगली आहे. प्रभासच्या या चित्रपटाचा टीझर चाहत्यांना आवडला, मात्र सोशल मीडियावर सैफ अली खान (saif ali khan) च्या लूकची लोकांनी खिल्ली उडवली. या चित्रपटात तो सैफ अली खान रावणाच्या लूकमध्ये दिसणार आहे. आता या सगळ्यानंतर या चित्रपटाबाबत नवा वाद समोर आला आहे, जो जाणून घेतल्यानंतर निर्माते खूपच नाराज दिसत आहेत.

या चित्रपटाच्या टीझर व्हिडीओमधील एका दृश्याबाबत बराच वाद सुरू आहे, त्यामुळे हा चित्रपट रिलीजपूर्वीच वादात सापडल्याचे दिसत आहे. प्रभास आणि क्रिती सेनन यांच्या आदिपुरुष चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यापासूनच चर्चेत आहे.

आता या चित्रपटाच्या टीझर व्हिडिओवरून नवा वाद निर्माण झाला आहे. टीझर व्हिडिओबाबत मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा (Narottam Mishra) यांचे वक्तव्य समोर आले आहे.

त्यांनी चित्रपट निर्मात्यांना कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. ते म्हणाले.., ‘या चित्रपटातील हिंदू देवतांचा पेहराव आणि लूक योग्य नाही, यात भगवान हनुमानाला चामडे घातलेले दाखवले आहे, धार्मिक भावना दुखावणारे हे दृश्य आहे.

हे सीन्स हटवण्यासाठी नरोत्तम मिश्रा यांनी ओम राऊत यांना पत्रही लिहिले आहे. सोशल मीडियावर देखील या चित्रपटाच्या टीझरचा जोरदार विरोध होताना दिसून येत आहे.

सोशल मीडियावर टीझरचा निषेध…

प्रभास आणि क्रिती सेनन यांच्या आदिपुरुष या चित्रपटाच्या टीझरबाबत सोशल मीडियावर जोरदार विरोध होत आहे. त्यावर बहिष्कार घालण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. यातील काही दृश्य प्रेक्षकांना आवडले नसल्याचे दिसून येत आहे.