मुंबई – गोपाळकाला उत्सवात गोविंदा थर लावून हंडी फोडतात. आम्ही 50 थर लावून सर्वात मोठी राजकीय हंडी फोडली असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नाव न घेता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांना लगावला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टेंभी नाका उत्सवात जोरदार टोलेबाजी केली. स्टेजवर येताच यावेळचा गोविंदा जोरात आहे ना?, अशी साद त्यांनी गोविंदाला घातली.

शिंदे पुढे म्हणाले, गोविंदाचा विमा पण दिला, सरनाईक आणि लोकप्रतिनिधींनी खेळाच्या दर्जाची मागणी केली होत ती मान्य करण्यात आली असल्याचे ते म्हणाले.

यावेळी ते पुढे म्हणाले, गोविंदा थर लावून हंडी फोडतात मात्र आम्ही 50 थर लावून सर्वात मोठी राजकीय हंडी फोडली असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांना लगावला.

बाळासाहेब आणि आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने हे शक्य झालं असून असेच थर यापुढे वाढत जातील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या या वक्तव्यावर बोलताना शिवसेना आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी खोचक टीका केली आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले, “दहीहंडी हा आमचा धार्मिक सण आहे राजकारण करण्यासाठी नाही. मात्र नक्की मलाई कुणी खाली हे पहा पाहायला पाहिजे,’ असा टोला आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लगावला आहे.

टेंभी नाका दहीहंडी उत्सवात अभिनेत्री श्रद्धा कपूरने (shraddha kapoor) लावली हजेरी…

टेंभी नाका दहीहंडी उत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूरने देखील हजेरी लावली. विशेष म्हणजे श्रद्धा कपूरने (shraddha kapoor) या उत्सवात गोविंदशी संपूर्ण मराठीत संवाद साधला.

टेंभी नाक्याची दिघे साहेबांची दहीहंडी ही सर्वात मोठी आणि मनाची हंडी असल्याचे सांगत मला या उत्सवात बोलावल्याने मला अभिमान असल्याचे तिने (shraddha kapoor) सांगितले.