पुणे – राज्यभरात अतिवृष्टीने शेतकऱ्यांची मोठी हानी झाली आहे मात्र शेतकऱ्यांना मदत देण्यात राज्य सरकार संवेदनहीन असल्याचा आरोप माजी पर्यटन मंत्री व शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केला. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पीक पाहणी दौऱ्यासाठी त्यांनी गुरुवारी शिरूर तालुक्याचा दौरा केला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) वडगाव आनंद ता जुन्नर (Junar) येथील कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केलेल्या दशरथ केदारी यांच्या कुटुंबीयांचीही त्यांनी भेट घेत सांत्वन केले.

यावेळी आपल्या व्यथा मांडताना कुटुंबीयांचे अश्रू आनावर झाले होते. तर शिवसेना या कुटुंबीयांचे पाठिशी उभी राहणार असून त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

यावेळी आदित्य (Aditya Thackeray) यांची छोटीसी कृती मोठा संदेश देऊन गेली अन् सर्वांना भावली. ‘‘राज्यात गद्दारीने स्थानापन्न झालेल्या घटनाबाह्य सरकारचे निर्दयपणे काम चालू असून,

लोकसेवा विसरून सत्तेत मश्गूल झालेल्या सत्ताधाऱ्यांचा केवळ राजकारणावर फोकस आहे. सद्यःस्थितीत अस्मानी संकटामुळे हवालदील झालेल्या शेतकरी बांधवांना सावरता येत नसेल; तर सरकारने चालते व्हावे,’’ असा इशारा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिला.

वडगाव आनंद येथील दशरथ लक्ष्मण केदारी या शेतक-याने 17 सप्टेंबर रोजी कर्जबाजारी पणाला कंटाळून चिठ्ठी लिहित शेततळ्यात आत्महत्या केली होती.

गुरूवारी नाशिक येथील दौ-यानंतर दुपारी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी जुन्नर तालुक्यात येत वडगाव आनंद रेथील आत्महत्या केलेल्या या शेतक-याच्यी कुटुंबीयांची भेट घेतली.

परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सचिन आहिर, संपर्क प्रमुख अविनाश रहाणे, जिल्हाप्रमुख सुरेश भोर व ज्ञानेश्वर कटके, जिल्हा संघटक संजय देशमुख, उपजिल्हाप्रमुख पोपट शेलार,

तालुकाप्रमुख सुधीर फराटे व गणेश जामदार, तालुका संघटक कैलास भोसले, उपतालुकाप्रमुख अनिल पवार, शिरूर शहरप्रमुख सुनील जाधव, युवासेनेचे तालुका संघटक संदीप शिंदे आदी या दौऱ्यात सहभागी झाले होते.