मुंबई: भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांचा जामीन अर्ज पुन्हा एकदा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. या प्रकरणावर शिवसेना (Shivsena) नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी पत्रकारांशी बोलताना राणे यांच्यावर निशाणा साधत टोला लगावला आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले, मला वाटते आपण चांगल्या गोष्टीवर बोलले पाहिजे, चांगली कामे केली पाहिजे, महाराष्ट्राला (Maharashtra) पुढे नेत राहू, देशाला पुढे नेऊ’ असे म्हणत राणे यांच्यावर टीका केली आहे. तसेच राज्यातील वेगवेगळ्या घडामोडींवर भाष्य केले आहे.

मात्र, मुंबई महापालिका निवडणूकीच्या (Mumbai Municipal Corporation) पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे.

Advertisement

तेथील विलेपार्ले पूर्व विधानसभा आणि वांद्रे पश्चिम विधानसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांना आदित्य ठाकरे यांनी मार्गदर्शन केले व पालिकेच्या नवीन वाढ रचनेप्रमाणे आढावा घेतला.

गेल्या दोन वर्षांपासून आम्ही मुंबई आणि महाराष्ट्रात आम्ही काम करत आहोत. सगळ्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांकडून फिडबॅक येत असतो.

त्याबद्दलचा आढावा घेणे गरजेचं असते लोकांमध्ये काय भावना आहे, त्यांची माहिती जाणून घेणे गरजेचे असते, असे ही आदित्य ठाकरे म्हणाले.

Advertisement

दरम्यान, आता निवडणुक (Election) लागणार आहे. त्यामुळे जनते पर्यंत पोहचावे लागणार आहे. त्यांच्या प्रश्नांचा घेतलेला निर्णय जनतेपर्यंत पोहचला पाहिजे असा आदेश ठाकरे यांनी दिला आहे. यावेळी आदित्य ठाकरेंसह विभाग प्रमुख परिवहन मंत्री अनिल परब आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई उपस्थित होते.