मुंबई : उपमुख्यमत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray) बारामती (Baramati) दौऱ्यावर असताना त्यांची गाडी (car) स्वतः चालवली होती. आता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची गाडी चालवली आहे.

बहुतेकदा व्हीआयपी (VIP) लोकांच्या गाड्या चालवण्यासाठी विशेष चालकांची निवड केली जाते. पण व्हीआयपी लोकच एकमेकांची गाडी चालवताना दिसत आहेत.

राज्यात २०१९ साली महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारची सत्ता महाराष्ट्रात (Maharashtra) आली आहे.

Advertisement

काही वेळा महाविकास आघाडी सरकारमधील नेतेच एकमेकांवर टीका करत असतात तर काही वेळा एकमेकांच्या मदतीला ही धावून आल्याचे आपण पहिले असेल.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना विधानसभेत सावरून घेतल्याचे पाहायला मिळाले होते. अजित पवारांनी मुंबई (Mumbai) महापालिका भेटे वेळीही आदित्य ठाकरेंचे कौतुक केले होते.

मुंबईच्या रस्त्यावर आदित्य ठाकरे आणि अजित पवार एकाच गाडीने प्रवास करताना पाहायला मिळाले आहे. यावेळी अजित पवारांच्या गाडीचे स्टिअरिंग आदित्य ठाकरेंच्या हाती असल्याचे पाहायला मिळाले आहे.

Advertisement

आदित्य ठाकरे आणि अजित पवार यांच्याकडून मुंबईतील विकासकामांची पाहणी करण्यात येत आहे. महालक्ष्मी, रेसकोर्स वरळी , धोबी तलावंची पाहणी दोन्ही नेत्यांकडून करण्यात आली आहे.