मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी मुंबईत (Mumbai) होणाऱ्या घटस्फोटाबाबत विधान केले होते. त्यांच्या या विधानाला आदित्य ठाकरे (Aditya Thackery) यांनी नकळत टोला लावला आहे.

अमृता फडणवीस यांनी मुंबईतील ट्रॅफिकच्या (Traffic) समस्येमुळे तीन टक्के घटस्फोट (Divorce) होत आहेत. असे विधान केले होते.

त्यानंतर शिवसेनेकडून (Shivsena) मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी देखील अमृता फडणवीस यांच्या या वक्तव्यावर टीका करताना, त्यांच्या या वक्तव्यावर हसावे की रडावे हेच कळत नसल्याचे म्हटले होते.

Advertisement

त्याचसोबत आता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील वक्तव्यावर खोचक निशाणा साधला. या वक्तव्याविषयी विचारणा केली असता, मला वाटते कॉमेडी आपण टीव्हीसाठी ठेवू. आपण राजकीय मंडळी म्हणून जे समाजकारण करत असतो, तेच आपण करत राहू, असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

यावेळी ते जोगेश्वरी पूर्वच्या पूनम नगरमधील महापालिका शाळेतील बास्केटबॉल कोर्टचे उद्घाटन कार्यक्रमानिमित्त पत्रकारांशी बोलत होते.त्यांच्या या विधानाने कार्यक्रमामध्ये हास्यमय गोंधळ निर्माण झाला आहे.

तसेच पुढे ते म्हणाले की, मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठीच्या शिवसेनेच्या भूमिकेविषयी देखील आदित्य ठाकरे यांनी यावेळी भाष्य केले. एवढी वर्ष जे आमचे मित्रपक्ष होते, त्यांना कुठे धक्का लागू नये, म्हणून आम्ही लढलो नव्हतो.

Advertisement

पण आता सगळीकडे लढत असताना आम्ही सगळीकडेच प्रचाराला जाणार आहोत. गेल्या दोन वर्षात आपले मुख्यमंत्री टॉप ५ मध्ये आले आहेत. हे फार कठीण आहे.