Pune : महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाडा या भागात विविध कारणामुळे शेतकऱ्यांच्या दुर्दैवी आत्महत्या होत्यात. कुटुंबाचा पालन पोषणकर्ता गेल्याने पाठीमागे राहिलेल्या कुटुंबाचं कस होईल असा प्रश्न निर्माण होतो. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात एका कुटुंबातील कर्त्या धरत्या व्यक्तीने आत्महत्या केली होती.(Milind Bhoi)

त्या कुटुंबाच्या मदतीसाठी भोई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मिलिंद भोई शेतकरी कुटुंबाच्या मदतीसाठी धावून आले. निमित्त होतं मुलीचं लग्न…. डॉ. भोई यांनी मुलीच्या विवाहानिमित्त नांदेड येथील अर्धापूरमधील लक्ष्मी साखरे यांना घर बांधून देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाचं समाज्याच्या सर्वचं स्तरातून कौतुक होत आहे. मुलीचं लग्न थाटात न करता डॉ. भोई यांनी सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला.

जेव्हा साखरे कुटुंब त्यांच्या नव्या घरी राहायला जाईल, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर असणारा आनंद माझ्यासाठी लाखमोलाचा असेल. ‘अशी भावना डॉ. भोई यांनी व्यक्त केली.

महत्त्वाचं म्हणजे अर्धापूर येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचे पालकत्व पुण्यातील भोई प्रतिष्ठानाने स्वीकारली आहे. शेतकऱ्या आत्महत्येनंतर कठीण परिस्थितीचा सामना करत लक्ष्मी साखरे पुन्हा मोठ्या जिद्दीने आयुष्य जगत आहेत.

गायत्री साखरे दिवसभर शाळा करून घरकामात मदत करून रात्री अभ्यास करून २०१९ मध्ये दहावी पास झाली आहे. तिने दहावीत चांगले यश संपादित केले आहे. गायत्रीच्या पुढील शिक्षणासाठीसुद्धा मदत केली जाईल असे डॉ. मिलिंद भोई यांनी सांगितले.