येथील व्यंकटेश सोसायटीमद्धे राहणारे राजकमल कनोजिया यांनी तब्बल सहा लाख रुपयांचे सोन्याचे दागिने (Gold Jewellery) परत केले आहेत.

यामध्ये मंगळसूत्र, अंगठी, गळ्यातील हार अश्या दागिनांचा समावेश होता. राजकमल कनोजिया हे अमराठी असून ते लॉन्ड्रीचालक आहेत. त्यांनी या प्रामाणिकपणाची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे.

झाले असे की,पुण्यातील व्यंकटेश सोसायटीमधील रहिवासी अशोक कनोजिया यांच्या घरी लग्नाचे शुभकार्य असल्यामुळे त्यांनी रविवारी इस्त्रीसाठी आपले कपडे दिले होते.

Advertisement

राजमल कनोजिया यांनी कपडे इस्त्री करण्यासाठी घेतल्यांनंतर त्यांना कोटाच्या खिशामध्ये सोन्याचे दागिने आढळून आले. सोन्याच्या दागिन्यांचे पाकिट बाजूला काढून कपड्याला इस्त्री केल्यानंतर राजकमल कनोजिया यांनी सोन्याचे दागिने अशोक कनोजिया यांच्या घरी नेऊन दिले.

या दागिन्यांची किंमत ही तब्बल ६ लाखांपर्यंत होती. अशोक कनोजिया यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या घरात लग्नकार्य असल्यामुळे घरी बहीण आली होती. तिचे दागिने माझ्या खिशामध्ये ठेवले होते. मात्र, ते सापडत नसल्याने मागिल आठवड्यापासून आम्ही शोधत होतो.

पण आम्हाला ते कुठेच सापडत नव्हते. महत्वाचे म्हणजे राजकमल कनोजिया हे कोणत्याही लोभाला बळी न पडता त्यांनी स्वतःचा प्रामाणिकपणा जपला आहे.

Advertisement

त्यामुळे त्यांची सर्वत्र चर्चा चालू असून राजकमल कनोजिया यांच्या या प्रामाणिकपणाचे कौतूक केले जात आहे. तसेच राजकमल कनोजिया यांचा व्यंकटेश सोसयाटीमध्ये प्रजासत्तादिनी सत्कार देखील करण्यात आला आहे.