राज्यात ओमिक्रॉन (Omicron) या कोरोनाच्या नव्या अवताराचा संसर्ग राज्यात वाढत असल्याचे दिसत आहे. डोंबिवलीनंतर आता पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे ओमिक्रॉनचे एकूण सात रुग्ण आढळले आहेत.

यानंतर आता पुणे जिल्ह्यातीलच आळंदी येथे ओमिक्रॉनचा आणखी एक रुग्ण (Omicron patient)आढळण्याची शक्यता आहे. या रुग्णाचे नमुने जेनोमिक सिक्वेंसिंगसाठी पाठवण्यात आले आहेत.

पुणे आणि पिंपरी चिंचवड (Pune and Pimpri Chinchwad) येथे ओमिक्रॉनची बाधा असलेले सात जाण आढळले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले असून त्यांना कोणतीही लक्षणे नुसून त्यांची प्रकृती सध्या उत्तम आहे.

Advertisement

मात्र पुणे आणि पिंपरी चिंचवडनंतर आळंदी येथे आणखी एक संशयित व्यक्ती आढळून आला आहे. त्याचे नमुने जेनोमिक सिक्वेंसिंगसाठी पाठवण्यात आले असून त्याचा अहवाल येणे अद्याप बाकी आहे.

पुण्यात सध्या आठ ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळले असले तरी घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे पिंपरी चिंचवडचे आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले आहे.(Pimpri-Chinchwad Commissioner Rajesh Patil)

नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळवे, घाबरून जाऊ नये, असे आमचे नागरिकांना आवाहन आहे. तसेच लसीकरण करुन प्रतिबंधक उपाय यांची अमंलबजावणी नागरिकांनी करावी, असे पिंपरी चिंचवडचे आयुक्त राजेश पाटील यांनी आवाहन केले आहे.

Advertisement