मुंबई : जम्बो कोविड सेंटर (Jumbo Covid Center) मध्ये १०० कोटींचा घोटाळा संजय राऊत (Sanjay Raut) आणि त्यांच्या मित्रपरिवाराने केला असल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला आहे.

किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांना अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याशेजारील खोली साफ करावी लागेल. त्यांनतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप (BJP) आणि किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला आहे.

संजय राऊत म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून, माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर निंदनीय आरोप होत आहेत. अपप्रचार करणाऱ्यांमुळे केंद्रीय यंत्रणांचा (Central Agency) केवळ गैरवापर केला जात नसून त्यांची बदनामीही होत आहे.

Advertisement

या अट्टल खोटारड्यांना लवकरच कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल. तसेच, “आणि लक्षात ठेवा: आमचे सरकार पडणार नाही आणि मी झुकणारही नाही! जय महाराष्ट्र!” असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.

या अगोदरही संजय राऊत यांना पत्रकारांकडून प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावेळी ते म्हणाले की, माझी संपत्ती काय असेल ती त्यांनी घेऊन टाकावी. तुमच्या संपत्त्या काय आहेत ते बघा.

मी मराठी माणूस आहे, माझी महाराष्ट्रातच संपत्ती असायला हवी. पण ती नाहीय. मराठी माणसाच्या हातात पैसे खेळू नये यासाठी षडयंत्र आहे असे राऊत म्हणाले आहेत.

Advertisement