मुंबई : भारतरत्न लता मंगेशकर (Bharat Ratna Lata Mangeshkar) यांच्या निधनानंतर जगभरातून अनेकांनी त्यांना गूगलवर सर्च (Internet Google Search) करत त्यांची माहिती मिळवली. तसेच छायाचित्रे (Photos) आणि स्टेटससाठी (Status) त्यांनी गायलेली गाणी (Songs) ठेवण्यासाठी त्यांना सार्वधिक सर्च केले होते.
विदेशातून (abroad) मोठ्या प्रमाणात लता मंगेशकर यांना सर्च करण्यात आले आहे. त्यांच्या निधनानंतर (Dead) रविवारी सकाळी दहा ते साडेअकरा या कालावधीत त्यांच्या विषयी अधिक जाणून घेण्यासाठी चाहते धरपड करत होते.
लता मंगेशकर यांची भारतासह मॉरिशिस, नेपाळ, दुबई, त्रिनीदाद, पाकिस्तान, बांगलादेश, कतार, ओमन आणि श्रीलंका या देशांमध्ये त्यांची माहिती सर्वाधिक शोधली आहे. लता दीदींचे भारताबाहेर देखील मोठ्या प्रमाणात चाहते होते.
परंतु भारतामधील काहींनी तर भलतच सर्च केलं आहे. ज्यामध्ये भारतात एवढी मोठी घटना झाली आहे, त्यामुळे राज्य सरकारने राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे का?
तसेच ही सुट्टी आपल्याला लागू होतेय का? हे पाहण्यासाठीही नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर ‘हॉलिडे फॉर लता’ असे सर्च केले आहे.
रविवारी सकाळी दहा ते साडेअकरा या वेळेचे सर्वाधिक सर्च
लता मंगेशकर
लता मंगेशकर लेटेस्ट न्यूज
लता मंगेशकर निधन
लता मंगेशकर के गाने