या स्टार्सच्या मृत्यूनंतर त्यांच्या जोडीदारावर संशयाची सुई फिरली होती:
चित्रपटसृष्टीत (bollywood) असे अनेक स्टार्स (stars) आहेत, ज्यांचा रहस्यमयी मृत्यू झाला. या स्टार्सच्या निधनामुळे एकीकडे जनतेला मोठा धक्का बसला होता, तर दुसरीकडे त्यांच्या साथीदारांना समाजाचे टोमणेही ऐकावे लागले होते. इतकेच नाही तर या सेलिब्रिटींच्या मृत्यूनंतर लोकांच्या संशयाची सुई त्यांच्या जोडीदाराकडे (partners doubted) वळली होती. या रिपोर्टमध्ये जाणून घ्या, या यादीत कोणाचं नाव आहे.

रेखा: (Rekha)
रेखाने 1990 मध्ये मुकेश अग्रवाल (Mukesh Agarwal) यांच्या सोबत मंदिरात लग्न केले. लग्नानंतर काही महिन्यांतच मुकेशने आत्महत्या (suicide) केली. मुकेशच्या मृत्यूनंतर सासरच्यांनी रेखाला खूप टोमणे मारले होते, सासूनेही रेखाला ‘डायन’ म्हटले होते.

रिया चक्रवर्ती: (Rhea Chakravarty)
अभिनेता सुशांत सिंग राजपूतने (Sushant Singh Rajput)14 जून 2020 रोजी आत्महत्या (suicide) केली. यादरम्यान रियावर सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला होता. या घटनेनंतर सुशांतच्या कुटुंबीयांकडून रियाविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता.

महेश भट्ट:(Mahesh Bhatt)
2005 मध्ये अभिनेत्री परबिन बॉबी (Parvin Bobby) तिच्या घरात गूढपणे मृतावस्थेत आढळून आली होती. परबिनच्या मृत्यूनंतर लोकांच्या संशयाची सुई महेश भट्ट यांच्याकडे गेली होती. कारण एकेकाळी महेश परवीनच्या खूप जवळ होते आणि दोघेही लिव्ह-इनमध्ये राहायचे.

साजिद नाडियादवाला:(Sajid Nadiadwala)
1992 मध्ये साजिद नाडियाडवालाने गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री दिव्या भारतीसोबत (Divya Bharti) लग्न केले. पण लग्नाच्या 11 महिन्यांनंतर दिव्याचा रहस्यमयी मृत्यू झाला होता, त्यानंतर लोकांचा संशय साजिदवर गेला.

सूरज पांचोली: (Suraj Pancholi)
अभिनेत्री जिया खानने (jia khan) २०१३ मध्ये आत्महत्या केली. अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर आदित्य पांचोलीचा मुलगा सूरजवर जियाच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे सूरजला सुमारे महिनाभर तुरुंगात राहावे लागले.

राहुल राज:(Rahul Raj)
‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जीने (Pratyusha Banerjee) 2016 मध्ये आत्महत्या केली होती. प्रत्युषाच्या मृत्यूनंतर प्रियकर राहुल राज सिंह संशयाच्या भोवऱ्यात आला.

अंकिता लोखंडे:(Ankita Lokhande)
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर लोकांनी अंकिता लोखंडेबद्दल बरेच काही सांगितले होते. इतकंच नाही तर अंकिताने सुशांतला सोडलं नसतं तर असं झालं नसतं असंही लोकांनी म्हटलं होतं.

शहनाज गिल:(Shehnaaz Gill)
सिद्धार्थ शुक्लाच्या (Siddarth Shukla) मृत्यूनंतर अभिनेत्री शहनाज गिललाही खूप लोकांचे म्हणणे ऐकावे लागले. लोकांनी शहनाजला खूप ट्रोल केले.