मुंबई – शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांचं रविवारी (14 ऑगस्टला) पहाटे अपघाती (accident) निधन झालं आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर (Mumbai Pune Express Highway) ही घटना घडली आहे. माडप बोगद्यामध्ये रविवारी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात (accident) झाला होता. अपघातानंतर जवळपास एक तासभर मेटे यांना कुठलीही मदत मिळाली नव्हती. असं देखील सांगितलं जात आहे.

मात्र, नंतर त्यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात (Navi Mumbai MGM Hospital) दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान मेटे (Vinayak Mete) यांचं निधन झालं.

दरम्यान, विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळासह सामाजिक चळवळीतील अनेकांना त्यांच्या या निधनामुळे धक्का बसला आहे.

प्रथमदर्शनी जरी हा अपघात वाटत असला तरी यात काही मंडळींनी घातपाताचा संशय व्यक्त केला होता. त्यामुळे या अपघात संबंधीचा तपास आता सीआयडी करत आहे.

विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या अपघाती मृत्यूबाबत दररोज समोर येणाऱ्या नवनव्या माहितीमुळे या प्रकरणातील संशयाचे धुके आणखीनच गडद होत चालले आहे.

अशातच आता विनायक मेटे यांचे भाचे बाळासाहेब चव्हाण यांनी केलेल्या दाव्यांमुळे पुन्हा खळबळ उडाल्याचे सांगितले जात आहे. अपघात घडला त्या दिवशी टोलनाक्यावरून गाडी गेली होती त्यामध्ये विनायक मेटे दिसत नव्हते,

असा दावा मेटे यांच्या भाच्याने केला आहे. यावेळी बाळासाहेब चव्हाण (balasaheb chavan) यांनी मेटेंच्या गाडीचा चालक एकनाथ कदम यांच्यावरही संशय व्यक्त केला.

मेटे यांचा अपघात झाल्यानंतर ड्रायव्हर एकनाथ कदम यांनी फोनवर चुकीची माहिती दिली. ज्या दिवशी विनायक मेटे यांचा अपघात झाला होता,

त्या वेळेस मी आणि शिवसंग्रामचे प्रवक्ते तुषार काकडे हे गांधी मेमोरियल हॉस्पिटलच्या दिशेने निघालो होतो, असे बाळासाहेब चव्हाण यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्यावरूनएक खळबळ निर्माण झाली आहे.

ते पुढे म्हणाले, “माझ्या परिचयातील एका व्यक्तीला फोन केला. त्याने मला सांगितले की, ड्रायव्हर आणि सुरक्षारक्षक यांना काहीही झाले नाही, मात्र विनायक मेटे यांनी जागी प्राण सोडला आहे.

हे समजल्यानंतर मी ड्रायव्हर एकनाथ कदम यांना फोन केला होता. ते बोलले की साहेब बरे आहेत, साहेबांना काही झाले नाही, मी वीस मिनिटे साहेबांसोबत बोलतोय, ते व्यवस्थित आहेत, अशी माहिती ड्रायव्हर एकनाथ कदम यांनी दिली.

मात्र, मी विनायक मेटे यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी फोन उचलला नाही, त्यामुळे ड्रायव्हर एकनाथ कदम यांच्या बोलण्याबाबत काय समजायचे? असा सवाल बाळासाहेब चव्हाण यांनी उपस्थित केला.