ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

पाबळच्या स्मशानभूमीत अघोरी प्रकार

पाबळ येथील स्मशानभूमीत अंधश्रद्धेचा अघोरी प्रकार उघड झाला आहे. एका काळ्या पिशवीवर कोहळा ठेवण्यात आला आहे. कोहळ्याचा खालचा भाग काळ्या पिशवीत आहे.

या कोहळ्याला टाचणी टोचून एका मुलीचा फोटो लावण्यात आलेला आहे. स्मशानभूमीत कोहळ्यावर मुलीचा फोटो लावून अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रकार घडल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गाव हादरले

या अघोरी प्रकारामुळे संपूर्ण गाव हादरलं आहे. याशिवाय गावाच्या आजूबाजूच्या गावांमध्येही हा प्रकार चर्चेला कारण ठरला आहे.

या प्रकरणावरुन अद्याप तरी संबंधितांवर कोणतीही कारवाई झाल्याची माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जिल्हाध्यक्ष नंदिनी जाधव यांनी या प्रकरणाची माहिती दिली.

स्मशानभूमीत नेमकं काय होतं ?

पाबळमधील स्मशानभूमीमध्ये दशक्रिया विधी सुरू असताना हा प्रकार उघड झाला. हा प्रकार उघड झाल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली आहे.

संबंधित प्रकरणाव अद्याप तरी कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. पोलिसांनी कारवाई करण्याचं ठरवलं तर हा अघोरी प्रकार नेमका कोणी केला?

याचा तपास करावा लागेल. कोहळ्यावर फोटो नेमका कोणत्या मुलीचा आहे? याची माहिती पोलिसांना मिळू शकते. तो कोहळा तिथे कोणी ठेवला याची माहिती मिळवणं हा तपासाचा एक भाग आहे.

बुलडाणा स्मशानभूमीत अघोरी प्रकार

दोन दिवसांपूर्वी बुलडाण्याच्या एका स्मशानभूमीतही अघोरी प्रकार उघड झाला होता. मलकापूर शहरातील माता महाकाली परिसरातील रहिवासी आशिष गोठी या युवकाच्या वडिलांचे आणि भावाचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले होते.

त्यांची आत्मशांती झाली नाही म्हणून त्याच्या घरात शांतता भंग पावली, असा त्याचा समज झाला. त्यावर उपाययोजना म्हणून आशिष गोठी याने तीन मांत्रिकांना स्मशानभूमीत पाचारण केले.

त्यांच्या उपस्थितीत चक्क दिव्यांची आरास मांडली. तसेच मंत्रोच्चार करून प्रेत जागृतीचा अघोरी प्रकार केला होता.

You might also like
2 li