मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केलेल्या आरोपानंतर शिवसेनेची १५ फेब्रुवारीला पत्रकार परिषद (Press conference) होणार आहे. या पत्रकार परिषदेमध्ये भाजपला (BJP) करारा जवाब देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

राऊत यांनी ही पत्रकार परिषद शिवसेनेची असेल व यामध्ये माझ्यावरील झालेल्या आरोपाला शिवसेना प्रतिउत्तर देईल असे ते म्हणाले आहेत. त्यामुळे तुम्हाला काय फायली काढायच्या त्या काढा. जेवढे भुंकायचे असेल तेवढे भुंका, असे राऊत यांनी म्हटले आहे.

यावेळी ते मीडियाशी संवाद साधत होते. त्यामुळे मंगळवारी शिवसेनेच्या पत्रकार परीषदेमध्ये कोणकोणते मुद्दे उपस्थित होतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement

दरम्यान कोव्हिड सेंटरमध्ये (Covid Center) कोणताही घोटाळा झाला नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्ट केले आहे. पण काही लोक भुंकत असतील. सवय असते काही लोकांना भुंकू द्या.

कोरोनाला लोक घाबरत होते, अशा वेळी काही संस्थेचे लोक पुढे आले. व त्यांनी कोव्हिड सेंटर चालवले आहेत. त्यावेळी भाजपचे लोक नव्हते. कारण ते घाबरत होते. राजकारण नंतर समाजकारण आधी, हा आमचा वसा आहे.

त्यानुसार आम्ही काम केले. तुमच्याही फायली तयार आहेत. तेव्हा कळेल फायली काय असतात. आम्ही तुम्हाला घाबरत नाही. तुमच्या पोटात दुखत असेल तर पोटावर उपचार करू, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला.

Advertisement