Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

शंभर टक्के इथेनाॅलवर वाहने चालविण्याचे उद्दीष्ट

रिन्युएबल ऊर्जेच्या क्षेत्रात स्वावलंबी होण्याचे आमचे उद्दीष्ट आहे. आम्ही असे तंत्रज्ञान विकसित करू, ज्याच्या मदतीने पेट्रोलऐवजी शंभर टक्के इथेनॉलवर वाहने धावतील.

ज्यांच्याकडे इलेक्ट्रिक कार आहे त्यांना आवाहन आहे, की त्यांनी केवळ सौर ऊर्जा किंवा रिन्युएबल एनर्जीच्या मदतीने आपली कार रिचार्ज करावी. यासाठी भविष्यात चार्जिंग स्टेशनची पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात तयार केली जाईल.

बॅटरी उद्योगाचा विकास

दीर्घकालीन कालावधीत शंभर टक्के इथेनॉलवर गाडी चालवण्याचे सरकारचे लक्ष्य असून, वर्ष 2023-24 पर्यंत सरकारने 20 टक्के इथेनॉल ब्लेंडिंगचे टार्गेट ठेवले आहे, असे उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी सांगितले.

Advertisement

गोयल म्हणाले, की बॅटरी तंत्रज्ञानाची मागणी येत्या काही दिवसांत लक्षणीय वाढणार आहे. रिन्युएबल सेक्टर बरीच प्रगती होईल, ज्यामुळे बॅटरी उद्योगाचा देखील विकास होईल.

175 गीगाव्हॅट रिन्युएबल एनर्जीचे लक्ष्य

सीआयआय आयोजित आत्मनिर्भर भारत परिषदेला संबोधित करताना गोयल म्हणाले, की 2020 पर्यंत रिन्युएबल एनर्जीचे लक्ष्य 175 गीगाव्हॅट निश्चित केले गेले आहे, तर 2030 पर्यंत रिन्युएबल एनर्जी लक्ष्य 450 गीगाव्हॅट आहे. 2025 पर्यंत 20 टक्के इथेनॉल मिक्सिंगचे लक्ष्य ठेवले केले.

सध्या इथेनॉल मिश्रण 8.5 टक्के

सरकारने 2022 पर्यंत दहा टक्के आणि 2030 पर्यंत 20 टक्के इथेनॉल मिश्रित करण्याचे लक्ष्य ठेवले होते. आता हे लक्ष्य पाच वर्षांपूर्वी शिफ्ट करण्यात आले आहे.

Advertisement

सध्या देशात पेट्रोलमध्ये जवळपास 8.5 टक्के इथेनॉल मिसळले जाते. वर्ष 2014 मध्ये ते केवळ 1-1.5 टक्क्यांच्या दरम्यान होते.

रिन्युएबल एनर्जीमध्ये 250 टक्के वाढ

रिन्युएबल एनर्जीच्या वापराबद्दल भारत खूप जागरूक आहे आणि गेल्या काही वर्षांत त्यात 250 टक्के वाढ झाली आहे. भारत जगातील अशा पाच देशांमध्ये आहे, जिथे रिन्युएबल एनर्जीचा सर्वाधिक वापर केला जात आहे.

हवामान बदल परफॉर्मन्स इंडेक्समध्येही पहिल्या दहा देशांमध्ये भारताचा समावेश आहे. अर्थव्यवस्था व पर्यावरणाच्या दिशेने पाऊल टाकण्याचा निर्णय भारताने घेतला आहे

Advertisement

 

Leave a comment