विमानाचे तिकीट बुक केल्यानंतर ते रद्द झाल्यास ग्राहकांना द्याव्या लागणाऱ्या रिफंडमध्ये तब्बल ७२ लाख ५५ हजारांचा अपहार करणाऱ्या टीम लीडरला विमानतळ पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता ५ दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.जावेद अश्फाक शेख (२९, रा. मेमाने बिल्डिंग, सुनीतानगर, वडगाव शेरी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत खुदबुद्दीन टोटुलाल पटेल (रा. गणेश विहार, ससाणेनगर, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार जानेवारी २०२१ ते ३१ जुलै २०२१ दरम्यान घडला.

Advertisement

फिर्यादी विमानाची तिकीट विक्री करणाऱ्या कंपनीत वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून नोकरीस आहेत. आरोपी जावेद शेख या कंपनीत साडेतीन वर्षांपासून टीम लीडर पदावर नोकरी करत आहे.

फिर्यादी यांच्या कंपनीचे अधिकारी विष्णू भगवान व्यवहाराची तपासणी करत होते. तेव्हा त्यांनी ग्राहकांना तिकीट रद्द झाल्यानंतर पाठवण्यात आलेल्या यादीची तपासणी केली. यात तिकिट रद्द केलेल्यांना पैसे न देता भलत्याच खात्यात पैसे गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

 

Advertisement