पुणे : राज्यातील वाढती कोरोना संख्या (Corona Patients) पाहता राज्यात निर्बंध लावण्यात आले आहेत. माध्यमांशी कोरोना बाबत बोलताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या.
उपमुख्यमंत्री अजित पवार माध्यमांशी कोरोना वाढीच्या (Corona Patients) संदर्भात बोलत होते. त्यावेळी त्यांना राज्यातील नियम (Maharashtra Corona Restriction) अधिक कठोर होणार का, असा प्रश्न विचारला होता.
त्यावर बोलताना अजित पवार यांनी बोलताना जर ऑक्सिजनची (Oxygen) मागणी वाढली तर निर्बंध वाढवण्यासंबंधीचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आदित्य ठाकरे घेतील असे म्हणाल्यामुळे सर्वजण गोंधळात पडले.
अजित पवार यांना उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे नाव घेयचे होते. पण त्याऐवजी त्यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव घेतले त्यामुळे वेगळ्याच चर्चांना उधाण आले आहे. अजित पवार यांनी जाणीवपूर्वक नाव घेतले का अशा प्रश्नांना तोंड फुटत आहे.
राज्यातील निर्बंध आणखी वाढवले जाणार आहेत का, असा प्रश्न पत्रकारांनी अजित पवार यांनी विचारला. त्याला उत्तर देताना अजित पवार यांनी म्हटले आहे की, नागरीकांच्या जीवाशी खेळ करुन चालणार नाही.
रात्रीची संचारबंदी आणि दिवसाची जमावबंदी सरकारनं सुरु केलेली आहे. पण जर ऑक्सिजनची मागणी वाढली, तर मात्र निर्बंध वाढवण्यासंबंधीचा निर्णय, राज्याचे मुख्यमंत्री आदित्य ठाकरे साहेब घेतील. असे अजित पवार यांनी म्हणाल्यामुळे थोड्या वेळापुरते सर्वजण गोंधळात पडले होते.