मुंबई – विरोधी पक्ष नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडून महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा (Shikhar Bank scam) प्रकरणाची चौकशी बंद करण्यात आली होती. पुन्हा ही चौकशी सुरू करीत मुंबई सत्र न्यायालयातील विशेष ईओडब्ल्यू कोर्टात पोलिसांच्यावतीने माहिती देण्यात आले आहे की, या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याकरिता कागदपत्र पुन्हा देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली असल्याने अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, शिखर बँक घोटाळा (Shikhar Bank scam) प्रकरणाचा तपास बंद करण्यात आला होता. त्यानंतर आता या प्रकरणाच्या तपासाची मागणी होत आहे. त्यामुळे, अजित पवार आणि अन्य ७६ संचालकांची पुन्हा अंमलबजावणी संचालनालयाद्वारे ( ईडी ) चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.

अजित पवार (Ajit Pawar) आणि अन्य ७६ जणांविरोधीत पुढील कारवाई करण्यासाठी ठोस पुरावे आढळले नसल्याचे आर्थिक गुन्हे विभागातर्फे (ईओडब्ल्यू ) सांगितले होते.

तसा, अहवाल ईओडब्ल्यूकडून न्यायालयात सादर करण्यात आला होता. पण, मूळ तक्रारदाराने केलेली निषेध याचिका आणि ईडी अहवालाच्या आधारे प्रकरणाचा पुढील तपास सुरू करण्यात आल्याचे ईओडब्ल्यूने म्हटलं आहे.

शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी सुरिंदर अरोरा यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विजयसिंह मोहिते-पाटील, आनंदराव अडसूळ,

शिवाजीराव नलावडे यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांवर एमआरए पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तब्बल २५ हजार कोटींचा हा घोटाळा असल्याचे सुरिंदर अरोरा यांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे.

दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याचा तपास बंद करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने हे प्रकरण पुन्हा उघडण्याची आणि घोटाळ्याची अधिक चौकशी करायची असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता अजित पवार यांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहे.