पुणे – राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) व धनंजय मुंडे (dhananjay munde) यांनी नुकतंच हिंगोली व नांदेड जिल्हाच्या केला दौरा केला आहे. राज्यातील शेतकरी अतिवृष्टीमुळे हवालदिल झाले असतांना मुख्यमंत्री (eknath shinde) अन उपमुख्यमंत्री (Devendra Fadnavis) मात्र दिल्ली दौरे करत आहेत त्यांनी दिल्ली व ईतर दौरे थांबून शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करून अडचणीतून बाहेर काढावे’ असं अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केलं.

यावेळी अजित पवार (Ajit Pawar) यांनी हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा व कुरुंदा येथील पूर परिस्थितीचा आढावा घेतला असून, राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी दिल्ली दौऱ्यातच व्यस्त आहे.

शेतकऱ्यांवर अतिवृष्टीमुळे मोठे संकट ओढवले असून त्यामुळे शेतकरी सध्या हवालदिल झाला आहे मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नकडे लक्ष न देता त्याचे दिल्ली दौरेच चालु आहेत.

Advertisement

राज्यातील शेतकऱ्यांना अडचणीतुन बाहेर काढण्यासाठी सरकारने तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी सरकारने प्रत्येक जिल्ह्यासाठी पालक मंत्र्यांना नियुक्त करून नुकसानीची माहिती घ्यावी,

तसेच राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान होऊन मोठा कालावधी लोटला तरी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री कोठे आहेत हे कळायला मार्ग नाही. असं अजित पवार म्हणाले.

पुढे ते म्हणाले, “सरकारने तातडीने आर्थिक मदत जाहीर करून शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढले पाहिजे असे त्यांनी या वेळी सांगितले अनेक शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले आहे.

Advertisement

त्यामुळे प्रशासनाच्या वतीने तात्काळ पंचनामे करून त्याना तातडीने मदत करावी अशी मागणी अजित पवार यांनी हिंगोली बोलताना केली.

गेल्या महिन्याभरापासून राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली असून, पुणे शहर आणि जिल्ह्यात मोठे नुकसान देखील झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

दरम्यान, यावेळी अजित पवार याणी हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची पाहणी केली, यावेळी माजी मंत्री धनंजय मुंढे यांचा सह राष्ट्रवादी कार्यकर्ते उपस्थितीत होते.

Advertisement