बारामती – तब्बल दोन वर्षांच्या कालखंडानंतर यंदा ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad pawar) यांचे निवासस्थान ‘गोविंदबाग’ (Govind Bagh) पुन्हा फुलले आहे.दिवाळी पाडव्याच्या (Diwali Padava) दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे बुधवारी गोविंदबाग (Govind Bagh) येथे नागरिकांना भेटले आणि दिवाळीच्या सुभेच्छा दिल्या. कोविडच्या संकटांमध्ये पाडवा (Diwali Padava) शुभेच्छांसाठी गोविंदबाग फुललीच नव्हती. यंदा कोविडचे संकट दूर झालेले असल्याने हे तीनही नेते नागरिकांना भेटले.

यामध्ये आमदार, खासदार, मंत्र्यांसह विविध अधिकारी, पदाधिकारी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा समावेश होता. यावेळी आपल्या आवडत्या नेत्याबरोबर सेल्फी, छायाचित्र काढण्याची संधीदेखील नागरिकांना मिळाली.

मात्र, यावेळी अजित (Ajit Pawar) पवारांच्या एका समर्थकांनं त्यांच्या निवासस्थानाबाहेर शुभेच्छांचं पोस्टर झळकवलं. यामध्ये अजित पवारांचा (Ajit Pawar) उल्लेख “भावी मुख्यमंत्री’ असा करण्यात आल्यानं या पोस्टरची सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे.

गोविंद बागेत पवार कुटुंबियांना शुभेच्छा देण्यासाठी राज्यभरातून त्यांचे शुभचिंतक भेट देतात. यावेळी शरद पवारही त्यांच्या शुभेच्छा स्विकारतात. त्यानुसार एक कार्यकर्ता अजित पवारांना भेटण्यासाठी आला होता.

त्यानं आपल्यासोबत एक बोर्ड आणला यावर अजितदादा, “महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख केला होता. हा फलक त्यानं गोविंद बागेबाहेर लावल्यानं त्याची सर्वत्र चर्चा सुरु होती.

कोणी सुरू केली परंपरा

वेगवेगळ्या कामानिमित्त पवार कुटुंबीय नेहमी घराबाहेरच असतात. त्यामुळे शरद पवार यांचे ज्येष्ठ बंधू अप्पासाहेब पवार यांनी किमान दिवाळीत तरी पवार कुटुंबीयांनी एकत्र जमावे ही परंपरा सुरू केली. तेव्हापासून पवार कुटुंबीय दिवाळीत एकत्र साजरी करतात.

यावेळी पवार नागरिकांच्याही भेटीगाठी घेतात. त्यामुळे दिवाळीच्या निमित्ताने का होईना शरद पवारांना पाहता यावे, त्यांच्याशी हास्तांदोलन करता यावे, यासाठी नागरिक मोठ्या संख्येने गोविंद बागेत येत आहेत.

गेल्या काही वर्षांपासून आता ही प्रथाच सुरू झाली आहे. यावेळी शरद पवार यांच्यासोबतच सर्व पवार कुटुंबीयच नागरिकांच्या भेटीगाठी घेत त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करतात.