पुणे : भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. त्यावरून चांगलेच राजकारण तापले होते. या सर्व प्रकरणावर अजित पवारांनी (Ajit Pawar) प्रतिक्रिया दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात (Pune) पत्रकार परिषद (Press Conference) घेऊन जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये (Jumbo Covid Center) कोणत्याही प्रकारचा घोटाळा झाला नाही. पारदर्शक काम झाले आहे असे स्पष्टीकरण दिले आहे.

अजित पवार म्हणाले की, जम्बो हॉस्पिटलच्या कामात राज्य सरकार आणि जिल्हा वार्षिक योजना आणि पालिकेचा हिस्सा असतो. सीओपीच्या मैदानावर आणि दुसऱ्या एका ठिकाणी दोन कोव्हिड सेंटर उभे करण्यात आले.

Advertisement

त्यात राजकीय पदाधिकाऱ्यांना सहभागी करून घेतले नव्हते. पीएमसी कमिश्नर विक्रम कुमार, पीसीएमसी कमिशनर राजेश पाटील, जिल्हाधिकारी, पीएमआरडीए कमिश्नर सुहास दिवसे आणि सीईओ जिल्हा परिषद आदींचा या कामात सहभाग होता.

त्यांना पारदर्शकपणे काम करण्यास सांगितले होते. आजच्या मिटिंगमध्ये हाच विषय पहिला घेतला. या बैठकीत सर्व माहिती मिळाली. ती समजून घेतली. त्यासंदर्भात एक नोट तयार करण्यास सांगितले आहे.

ती नोट मीडियालाही देऊ. मात्र, या कोव्हिड सेंटरमध्ये काही चुकीचे झाले नाही, असे म्हणत अजित पवार यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या आरोपाला उत्तर दिले आहे.

Advertisement