मुंबई : राज्यातील शाळा सुरु करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेण्यात आला आहे. त्यानुसार काही वर्ग सुरूही करण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पहिली ते आठवीच्या शाळा (1st to 8 th Schools) सुरु करण्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

१ फेब्रुवारी पासून राज्यातल्या शाळा (State School) सुरु करण्यात आल्या आहेत. पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा पूर्ण क्षमतेने सुरु करण्यात आल्या नव्हत्या. ५० टक्के क्षमतेने या शाळा सुरु करण्यात आल्या होत्या.

कोरोना ची रुग्णसंख्या (Corona Patients) पाहता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फुल डे शाळा (Full Day School)  सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत अजित पवार यांनी फुल डे शाळा सुरु करण्याबाबत माहिती दिली आहे.

Advertisement

अजित पवार म्हणाले, देशात गेल्या आठवड्यात ३० टक्के कोरोनाचे रुग्ण घातले आहेत. तसेच महाराष्ट्रात ४२ टक्के कोरोनाचे रुग्ण घातले आहेत. आणि पुण्यात ५० टक्के सक्रिय रुग्ण घटल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये १५ ते १८ च्या वयोगटात लसीकरणात थोडे मागे पडलो आहे.

जम्बो रुग्णालयाच्या  (Jambo Hospital) भाड्याचा भार पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिकेवर आला आहे असेही अजित पवार म्हणाले आहेत.

Advertisement