पुणे : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षावर टीका केली होती. त्यालाच प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना दिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने ३ राज्यात निवडणूका (Election) लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला खोचक टोला लगावला होता.

भाजप (BJP) नेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा गल्लीतला पक्ष म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना (Sharad Pawar) गांभीर्याने घेण्याची गरज नाही अशी खोचक टीका केली होती.

Advertisement

यालाच प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. शरद पवारांची उंची आणि देशपातळीवरील काम पाहून नव्या पीढीने बोलताना तारतम्य पाळले पाहिजे असे अजित पवार म्हणाले आहेत.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, “महाराष्ट्रापुरते (Maharashtra) जे काही असेल ते मला विचारा, मी त्याचं उत्तर सडेतोडपणे देईल. देशाच्या राजकारणात आमचे वरिष्ठ बोलत असतात.

कुणालाही कमी-जास्त लेखण्याचा प्रयत्न करू नये. प्रत्येकजण आपआपल्या परीने काम करत तिथपर्यंत पोहचलेला आहे. राजकारणाविषयी खूप काही बोलता येईल. असे म्हणत फडणवीसांना अजित पवारांनी उत्तर दिले आहे.

Advertisement