पुणे – भारतीय जनता पक्षाचे नेते, पालकमंत्री आणि राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Bjp Chandrakant Patil) नुकतेच पुण्यात (pune) होते. एका कार्यक्रमासाठी ते पुण्यात दाखल झालं होते. मात्र, चंद्रकांत पाटील (Bjp Chandrakant Patil) कार्यक्रमस्थळी येताच मोठ्या आवाजात स्पीकरवर “राष्ट्रवादी पुन्हा…” (ncp election song) हे गाणं वाजण्याच्या आलं असल्याचं दिसून आलं आहे. बरं गोष्ट एवढ्यावर संपत नाही. पोलिसांनी तिथे गाणं वाजवणाऱ्या डीजेला अटक सुद्धा केली आहे.

झालं असं की, पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील दिवाळीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमात पुण्यातल्या रास्ता पेठेत आले होते.

पाटील कार्यक्रमस्थळी येताच तिथे उपस्थित असलेल्या डीजेने अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रचार गीत (ncp election song) लावलं. यानंतर उपस्थितांमध्ये थोडासा गोंधळ कुजबूज झाली आणि त्यानंतर मात्र पोलिसांनी या डीजेला ताब्यात घेतलं.

दरम्यान, आता या सगळ्या घटनेवर राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार ? (Ajit Pawar) यांनी आपली प्रतिक्रया दिली आहे. यावेळी ते पत्रकारांशी सवांद साधत होते.

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, “यंदाच्या निवडणुकीत घड्याळ चालवा. मी दोन मिनिटांत प्रश्न सोडवतो. शिंदे, फडणवीस सरकारमधील कोण नाराज आहे, मला माहिती नाही.

आणि जर कार्यक्रमात राष्ट्रवादीच गाणं वाजलं तर बिघडलं कुठं. कधी कधी एखाद्या कार्यक्रमात होतं. एवढं त्याला महत्त्व देण्याची गरज नाही, असं अजित पवार यावेळी म्हणाले.

तसेच, यावेळी अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. “लाव रे तो व्हिडीओ असं म्हणताच, सहा महिन्यांपूर्वी राज ठाकरे यांची भूमिका काय होती. विचार काय होते आणि आता काय ? असं म्हणत राज ठाकरे यांचं नाव न घेता अजित पवार यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला.