पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या मोबाईल क्रमांकाचा (Mobile Number) अँपद्वारे (App) गैरवापर (Abuse) केल्याची धक्कादायक (Shocking) घटना घडली आहे. राज्याच्या उपमुख्यत्र्यांच्याच मोबाईल क्रमांकाचा गैरवापर केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

उपमुख्यमंत्र्यांच्या मोबाईल क्रमांकाचा गैरवापर करत पुण्यातील (Pune) एका मोठ्या बांधकाम व व्यवसायिकाला (Pune Builder) धमकी देण्यात आली आहे. अँपचा गैरवापर करून फोन लावल्याचा प्रकार घडला आहे.

आरोपीने अँप द्वारे मोबाइलला क्रमांकाचा गैरवापर करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पीए चौबे (PA Choubey) बोलत असल्याचे सांगून बांधकाम व्यावसायिकाकडे २० लाखांची खंडणी (Ransom) मागितल्याचा प्रकार घडला आहे.

Advertisement

याप्रकरणी पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये (Bundgarden Police Station) गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.

याअगोदर आरोपींनी बांधकाम व्यावसायिकाकडून २ लाख घेतल्याची माहिती असून खंडणी प्रकरणात सहा जणांना अटक (Arrest) करण्यात आली आहे.

आरोपींकडून १० दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पीए चौबे बोलत आहे असे सांगून धमकी देऊन खंडणी मागण्याचा प्रकार चालू होता. बाधंकाम व्यावसायिकाने बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये अखेर तक्रार दाखल केली आहे.

Advertisement

बंडगार्डन पोलीस स्टेशनमधल्या पोलिसांनी आरोपीना ताब्यात घेतले आहे. कलम 384, 386, 506, 34 आयटी ॲक्ट कलम 66 (सी), (डी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.