पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit shah) आज पुणे (Pune) दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या दौऱ्यासाठी पुणे महानगरपालिकेकडून (Pune Municipal Corporation) जय्यत तयारी कारणात आली आहे.
तसेच महापालिकेच्या इमारतीवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. अमित शाह यांच्या हस्ते महापालिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे.
तसेच तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळ्याचे भूमिपूजनही अमित शाह (Amit shah) यांच्या हस्ते होणार आहे.
अमित शाह यांची पुणे दौऱ्यात मुक्कामाची गैरसोय होत असल्याने अजित पवारांनी सर्किट हाऊसमधील त्यांचा राखीव सूट अमित शाह यांना दिले आहे.
मनसेतून (MNS) नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) मध्ये प्रवेश केलेल्या रुपाली पाटील (Rupali Patil) यांनी अजित पवारांचे (Ajit Pawar) कौतुक केले आहे.
अजित पवारांनी सर्किट हाऊसमधील (Circuit House) त्यांचा राखीव सूट अमित शाह यांना दिला आहे. हेच आहेत शरद पवार (Sharad Pawar) यांचे संस्कार आहेत असे म्हणत पाटील यांनी ट्विट केले आहे.
देशाचे गृहमंत्री @AmitShah यांची पुणे दौऱ्यात मुक्क्माची गैरसोय होते कळताच उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांनी पुणे सर्किट हाऊसमधील त्यांचा राखीव सूट मा.अमितजी शहा यांना देऊन महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचे दर्शन दिलेत . हेच आहेत @PawarSpeaks साहेबांचे संस्कार @NCPspeaks
— Rupalipatilthombare (@Rupalispeak) December 18, 2021
महापालिकेतील कार्यक्रमानंतर 3 वाजता अमित शहांच्या उपस्थितीत भाजप बूथ कार्यकर्ता संवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी अमित शाह कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.