उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मामा घाडगे यांच्या जरंडेश्वर कारखान्याची चाैकशी उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार झाली आहे, कुठल्याही राजकीय हेतूने नाही, असे स्पष्टीकरण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.

चाैकशीची मागणी म्हणजे फासावर लटकावणे नव्हे

नेहमीच कुठलाही पक्ष एखाद्या घटनेच्या चौकशीची मागणी करीत असतो. याचा अर्थ कुणावर चौकशी करावी म्हणजे त्याला फासावर लटकावे किंवा जेलमध्ये टाकावे असे होत नाही.

मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली. त्यावेळी न्यायधीशांनी याचिकाकर्त्यांनी टाकलेल्या नावांवर एफआयआर दाखल करावी असे थेट आदेश दिले होते, असे त्यांनी सांगितले.

Advertisement

एफआयआर नोंदविल्यानंतर यात आर्थिक गोष्टी असल्यामुळेच ईडीने चौकशी सुरू केली आहे. राजकीय हेतूने सुरू केलेली ही चौकशी नाही, असे फडणवीस म्हणाले.

राजकीय पतंगबाजीचा लुटला आनंद

मी दिल्लीला कुठल्याही कारणांनी गेलो की पतंगबाजी होते. या पतंगबाजीचा आनंद मी आज दिवसभर घेतला. मी नागपूरचे एक शिष्टमंडळ दिल्लीला घेऊन गेलो होतो.

धर्मेश प्रधान यांना भेटल्यावर वेळ होता म्हणून अमित शाह यांना भेटलो, असे त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

Advertisement

उशिरा सुचलेले शहाणपण

ओबीसींचा डेटा तयार करण्यासंदर्भात अधिसूचना काढण्यात आली आहे. त्याचे स्वागत आहे. देर आये पर दुरुस्त आहे. हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे.

सरकारने बराच वेळ खर्च केला. जाणीवपूर्वक राज्य सरकारने केंद्राकडे बोट दाखवले, असा आरोप फडणवीस यांनी केला.

 

Advertisement