मुंबई – करोनानंतर यावर्षी सर्वत्र दहीहंडी (Dahi Handi) उत्सवाचं मोठं आयोजन पाहायला मिळालं असून, सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. यंदा तब्बल दोन वर्षांच्या खंडानंतर दहीहंडीचा (Dahi Handi) उत्सव साजरा झाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी दहीहंडीचा समावेश खेळामध्ये केला आहे. तसेच, शिंदे सरकारने दहीहंडी दरम्यान गोविंदाचा मृत्यू झाल्यास दहा लाखांचा विमा कवच देण्याची घोषणा सुद्धा केली.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी विधानसभेत दहीहंडीचा खेळात समावेश करण्यात आल्याची घोषणा केली आहे.

तसेच, राज्यात प्रो कब्बडी प्रेमाणे प्रो दहीहंडी (Dahi Handi) स्पर्धा खेळवल्या जाणार आहेत. सरकारी नोकरीमध्ये गोविंदाना 5 टक्के आरक्षणाचा लाभ मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

मात्र, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या घोषणे नंतर यावर राजकीय प्रतिक्रिया येताना दिसून येत आहेत. विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

अजित म्हणाले, “सरकारमध्ये असताना ज्या खेळांना ऑलिम्पिकमध्ये (Olympics), आपल्या देशामध्ये मान्यता आहे, असे खेळाडू हे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर पदके मिळवतात.

त्यांना क्लास वन, क्लास टूची पोस्ट आपण देतो. पण त्यांचे क्वालिफिकेशन देऊन ते देत असतो. त्यांना पाच टक्के आरक्षण देण्यात आले. त्यात राज्याच्या संघटना असतात.

यात तुम्ही गोविंदांचे काय रेकॉर्ड ठेवणार आहात, अस सवाल विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्य सरकारला केला आहे.

ते पुढे म्हणाले, हा निर्णय झाला त्याच्या दुसऱ्याच दिवशी दहीहंडी होती. याविषयी आम्ही लगेच प्रतिक्रिया मांडली नाही, ती सोमवारी सभागृहात मांडू असं देखील अजित पवार यावेळी म्हणाले

गोविंदा पथके पुणे, पिंपरी चिंचवड, ठाणे, मुंबई याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. मी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचा अध्यक्ष आहे. ऑलिम्पिक मान्यता असलेल्या खेळाडूंना आपण आरक्षण ठेवले आहे.

मात्र गोविंदांना आरक्षण देताना काय निकष ठेवणार? गोविंदा पथकामध्ये सर्वात वरच्या थरावर कमी वयाचा, वजनाचा मुलगा असतो.

अशा वेळी त्याचे काय क्वालिफिकेशन ग्राह्य धरणार? याची माहिती तुम्हाला कोण देणार? असा प्रश्न विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपस्थित केला आहे.