File Photo

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार (MLA) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी राजकारणाला सुरुवात कारण्यावेळीच एक किस्सा सांगितला आहे. बँकेची निवडणूक (Bank Election) लढून राजकारणाला सुरुवात केल्याचे त्यांनी सांगितले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा बँकेची निवडणूक (District Bank Election) लढून राजकारणात प्रवेश केला आहे. अजित पवार यांनी बोलताना संगितले की, पुणे जिल्हा बँक ही ग्रामीण भागासाठी महत्वाची बँक म्हणून ओळखली जाते.

मला आठवतय 1991 साली त्यावेळी स्वर्गीय सुभाष अण्णा कुल व रमेश थोरात (Ramesh Thorat) यांनी एका कार्यक्रमात सांगितले होते की, तुम्हाला जिल्हा बँकेच्या राजकारणात यायच असेल तर पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी अ वर्गातून निवडणूक लढवा.

Advertisement

त्यावेळी बारामतीतील (Baramati) जागा कधी आपल्या विचारात येत नव्हती, तिथे आपले सहकारी काकडे परिवाराचे वर्चस्व होते. त्यामुळे तिथे निवडणूक लढवायला नाखूष असायचो.

पण या दोघांचे म्हणणे मी ऐकले त्यावेळी धाडस दाखवले. लोकांना वैयक्तिक भेटलो. लोकांनी मला निवडणूक दिले अन मी बँकेत गेलो. तेव्हा बँकेच्या ठेवी 391 कोटी रुपये होत्या.

आज या गोष्टीला 30 वर्ष झाली आहेत. बँकेच्या ठेवी आता 11 हजार कोटीच्या पुढे गेल्या आहेत. असा अजित पवार यांनी बोलताना त्यांच्या राजकारणातील प्रवेशावेळीचा किस्सा सांगितला आहे.

Advertisement

जिल्हा बँकांनी जिल्हा परिषदेचे पैसेही बुडवले. शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाहीत. शेतीच्या सुधारणेसाठी आवश्यक असलेल्या सुधारणा होत नाहीत. कारण तिथली परिस्थिती बिकट झाली आहे.

कर्मचाऱ्यांचे पगार व्यवस्थित होत नाहीत. नागरिकांनी, ग्रामस्थांनी विश्वासाने ठेवलेला पैस, तिथे व्यवस्थित राहायला पाहिजे. यासाठी आम्ही काही नियम केले आहेत. असे मत अजित पवार यांनी बोलताना व्यक्त केले आहे.

कोरोना (Corona) संकटावरही अजित पवार यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले जानेवारीच्या शेवट कोरोना विषाणूची (Corona virus) ​तिसरी लाट येणार आहे. काळजी घेण्याची गरज आहे. नियम पाळावेच लागणार आहेत.

Advertisement