चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांवर एक गंभीर आरोप केलाय. अजित पवार यांनी आयुष्यभर पैसे काढून घेण्याचं, जमिनी लाटण्याचं काम केलं. अजित पवार हे हेलिकॉप्टरने जमिनी शोधत असतात, कुणाची जमीन शिल्लक आहे.

अजित पवार धरणाची जमीनही सोडत नाहीत. लोकांमध्ये अजित पवारांची भीती आहे, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी अजितदादांवर जोरदार निशाणा साधलाय.

चंद्रकांत पाटील आज पुण्यातील मांजरी या गावातील पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. चंद्रकांत पाटलांचा नेमका आरोप काय? ‘अडाणी म्हाताऱ्या माणसालाही हे माहिती आहे की 6 हजार रुपये मोदी देतात.

Advertisement

आता मग तो मत मोदींना देणार की पवारांना देणार? की ज्यांनी आयुष्यभर पैसे लोकांचे पैसे काढून घेण्याचंच काम केलं. जमिनी काढून घेण्याचं काम केलं.

मला असं कळलं की मांजरीवाल्यांना काही वर्षापूर्वी महापालिकेत दाखल करुन घेण्यात आलं होतं. तेव्हा ते नको बोलले कारण पवार आमच्या जमिनी लाटून घेतात.

म्हणून पुन्हा ते महापालिकेतून काढून घेण्यात आलं. एकदा गेले होतो महापालिकेत पण अजित पवारांची इतकी भीती की, म्हणाले आमच्या जमिनीवर आरक्षण टाकतील आणि घेऊन जातील.

Advertisement

ते हेलिकॉप्टरने वरुन बघतात की कुणाकुणाच्या जमिनी शिल्लक आहेत. धरणाच्या सोडत नाहीत, कशाच्याच सोडत नाहीत. त्यामुळे लोकांना हे कळतं की मोदी 6 हजार रुपये देतात,

कोरोना लस देतात, गरोदर स्त्रिला 6 हजार रुपये देतात, रेशन फ्री देतात, टॉयलेट फ्री देतात, गॅस फ्री देतात’, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

Advertisement