बारामती – राजकारणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांची जवळीक सध्या वाढल्याचे दिसून येत आहे. यातच, काल मनसेकडून मुंबईतील शिवाजी पार्कवर करण्यात आलेल्या दीपोत्सवाच्या (diwali) कार्यक्रमात हे तीनही नेते एकत्र आल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यावेळी मनसेच्या दीपोत्सवाचे (diwali) उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज यांच्याकडून मुंख्यमंत्र्यांचा सत्कारही करण्यात आला. यानंतर मैदानावर फटाक्यांची जबरदस्त आतशबाजीही बघायला मिळाली.

मनसेच्या या दीपोत्सव कार्यक्रमात प्रथमच मनसे प्रमुख राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र आल्याने, आता राज्यातील राजकीय वर्तुळात भाजप-मनसे आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्या महायुतीसंदर्भात चर्चा सुरू झाली आहे.

अश्यातच, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्या एकत्र येण्यावर भाष्य केलं असून, पुन्हा एकदा चर्चला उधाण येणार हे नक्कीच.

काय म्हणाले? अजित पवार

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, “राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिंदे-फडणवीस एकत्र आल्यास काहीही चुकीचं नाही. काही अडचण नाही, दिवाळीचा सण आहे. दोन वर्षानंतर हा सण आपण साजरा करतोय. त्यामुळे सगळ्यांनी एकत्र यावं. शुभेच्छा द्याव्यात. त्यात चुकीचं काय?

राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे तिघे एकत्र आले असतील तर त्याच्यात चुकीचं काय आहे?, असं अजित पवार म्हणालेत. दिवाळीनिमित्त पवार कुटुंब बारामतीत आहे. यावेळी अजित पवार (Ajit Pawar) यांनी माध्यमांशी संवाद साधला.

दरम्यान, राज ठाकरे आणि भाजप तसंच शिंदेगटाच्या नेत्यांच्या वाढत्या भेटींमुळे युतीच्या चर्चा होत आहेत. त्यातच काल शिंदे-फडणवीस एकाच मंचावर पाहायला मिळाले. त्यावरून पुन्हा एकदा युतीची चर्चा राज्यात होऊ लागली आहे.