मुंबई – महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. तर, दुसरीकडे शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे सध्या महाराष्ट्रात शिंदे सरकार स्थापन झाले आहे. दरम्यान, एकनाथ शिंदेंच्या या भूमिकेमुळे शिवसेनेत मोठा पेच निर्माण झाला असून, दिवसागणित अनेक अडचणी निर्माण होत आहे. सध्या शिंदे गट (Shinde Group) आणि उद्धव ठाकरे यांच्यात आम्हीच खरी शिवसेना आहोत असा दावा सतत करण्यात येत आहे.

दरम्यान, शिवसेनेत झालेल्या अभूतपूर्व फुटीचे सावट यंदाच्या दसरा मेळाव्यावरदेखील (Shivsena Dasara Melava) दिसू लागले आहे.

शिवाजी पार्कमध्ये दरवर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा होतो. मात्र यंदा दसरा मेळावा कोणाचा असणार एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे असा नवा वाद आता निर्माण झाला आहे.

शिवसेना आणि दसरा मेळावा हे अतूट नातं आहे. दसरा मेळावा हा शिवसेनेची ओळख आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (balasaheb thakre) यांनी या परंपरेची सुरुवात केली होती.

बाळासाहेब ठाकरे (balasaheb thakre) यांच्या निधनानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दरवर्षी दसरा मेळाव्यात संबोधित करत असतात. मात्र, यंदा दसरा मेळाव्यावरून नवा वाद सुरु झाला आहे.

दरम्यान, दसरा मेळाव्यावरून दोन्ही गट आमने-सामने आले असताना या प्रकरणावर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

अजित पवार म्हणाले…

“शिवसेना स्थापन झाल्यापासून बाळासाहेबांनी शिवाजी पार्कवर सभा घेतल्या. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेना (Shivsena) चालेल, असं बाळासाहेबांनी सांगितलं होतं.

ज्यांच्या हातात पॉवर आहे ते पाहिजे तशा गोष्टी करतात आधी एकाचा आणि नंतर दुसऱ्याचा कार्यक्रम होईल वाद घालून चालणार नाही. मात्र जनता कोणाच्या पाठीशी आहे हे शिवाजी पार्कची सभा झाल्यानंतरच कळेल.

निवडणूक झाल्यानंतर कळेल कोणाची शिवसेना खरी कुणाची ते.” असं विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले आहेत.

ते पुढे म्हणाले, “लोकशाही पद्धतीने आलेल्या आमच्या सरकारने कॅबिनेटचा ठराव करून यादी पाठवली होती आम्ही अनेक जण राज्यपालांना भेटायला गेलो होतो. ते तेव्हा म्हणाले होते बघतो करतो तेव्हा तर काय झालं नाही.

आता आम्ही काय टीका टिपणी करणार जनतेने ठरवायचं हे लोकशाही पद्धतीने चालला आहे का?.” असंही अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले आहेत.