औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार आणि राज्याचे उपमुख्यमत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत गंगापूरमधील (Gangapur) नगरसेवकांनी (Corporator) राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला त्यावेळी अजित पवार बोलत होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थिती मध्ये गंगापूरमधील काही नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत हाती घड्याळ बांधले आहे. यावेळी बोलताना अजित पवार यांना आर आर आबांची आठवण झाली आहे.

अजित पवार म्हणाले, आम्ही या पक्षातम काल आलेला आणि जुना असा भेदभाव करत नसतो. कोणती राजकीय पार्श्वभूमी नसतानाही अनेकांना पदे मिळाली. आर, आर, पाटील (R. R. Patil) असेच एक नाव आहे त्यांनी अनेक पद भूषवली असे म्हणत आबांची आठवण काढली.

Advertisement

पुढे बोलताना ते म्हणाले, आपल्याला लोकांसाठी काम करायचे आहे. पक्षपात करू नका, कुणाबद्दलही आकस बाळगू नका, सर्वांची कामे समतोलने करा. हलक्या कानाचे अजिबात होऊ नका असेही अजित पवार कार्यकर्त्यांना म्हणाले आहेत.

मविआ सरकार चांगले काम करत आहे, राज्यात जरी सरकारमध्ये एकत्र असलो तरी प्रत्येकजण आपला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी अजित पवार यांनी दिली आहे.

राज्यात नगरपंचायतीच्या निवडणुकीतही राष्ट्रवादीचा चांगलाच बोलबाला पहायला मिळाला. स्थानिक पातळीवर संघटन मजबूत करण्यावर राष्ट्रवादीचा नेहमीच भर राहिला आहे.

Advertisement

आज नगसेवकांच्या प्रवेशाने पुन्हा ते दिसून आले आहे. या नगरसेवकांच्या प्रवेशाने गंगापूरमध्ये राष्ट्रवादीचे पारडे जड झाले आहे, एवढे मात्र नक्की. पदवीधर मतदारसंघात आपल्याला चांगले यश मिळाले आहे.

मात्र तालुका पातळीवर वेगळे चित्र दिसते, त्यामुळे या पातळीवर जास्त काम करण्याची गरज आहे, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत.

Advertisement