पुणे : राज्यात पेपरफुटी (Exam Paper leak) प्रकरणावरून राजकारण (Politics) चांगलेच तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये या प्रकरणावरून चांगलेच राजकारण आहे. पोलीस (Police) चौकशीत जसजशी माहिती समोर येत आहे आहे तास तसे आरोप प्रत्यारोपाचे सत्र वाढतच चालले आहे.

पेपरफुटी प्रकरणावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) म्हणाले, शहाण्यांना शहाणे करण्यासाठीच अध्यापक विकास संस्था (Teacher Development Institute) काम करणार आहे, असे सांगतानाच कोण सुपे?

त्यांच्याकडे नोटा सापडत आहेत. त्याचे धागेदोरे कुठपर्यंतही जाऊ द्या, त्यांच्यावर कारवाई होणारच, असा इशाराच अजित पवार यांनी दिला.

Advertisement

महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेचा (Maharashtra State Teacher Development Institute) उद्घाटन सोहळा पार पडला.

यावेळी अजित पवार बोलत होते. अजित पवार यांनी शिक्षकांनाही (Teacher) कानपिचक्या दिल्या. शहाण्यांना अधिक शहाणं करण्यासाठी ही संस्था काम करणार आहे.

यशदा (Yashada) या संस्थेमार्फत या आधी प्रशिक्षण (Training) दिले जात आहे. नवीन नवीन गोष्टी देण्याकरिता राज्य सरकारने पुढे राहिले पाहिजे.

Advertisement

सारथीच्या इमारतीचे (Chariot building) काम लवकरच सुरू करायचे आहे. मुख्यमंत्र्यांची तारीख मिळाल्यावर त्याचे भूमीपूजन केले जाणार आहे, असे अजित पवार यांनी सांगितले आहे.

पवार बोलताना म्हणाले, काळ बदलला आहे. विद्यार्थी बदलले आहेत. त्यामुळे शिक्षकांनी बदलले पाहिजे. आजचे विद्यार्थी शिक्षकांपेक्षा हुशार झाले आहेत. इंटरनेटमुळे (Internet)जगाशी जोडले गेले आहेत.

इंटरनेटच्या माध्यमातून जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात काय माहिती मिळते यासंदर्भात आजचे विद्यार्थी जागृत आहेत. शिक्षकांनी नवा दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे, त्यासाठी ही संस्था सुरू करण्याचा उद्देश आहे, असे अजित पवार म्हणाले.

Advertisement