मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आपल्यावर पाळत ठेवत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार संतप्त झाले आहेत.

त्यांनी हा आरोप खोडून काढला असून, पटोले यांच्यामुळे राज्य सरकारच्या स्थैर्याला सुरुंग लागत आहे, अशी संतप्त भावना त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानी घातली.

पटोले यांची वक्तव्ये स्थैर्याला धोका करणारी

राज्य सरकारला पावणेदोन वर्षे पूर्ण होत आली आहेत. सरकार अस्थिर असल्याचे भाजप सांगत असताना महाविकास आघाडीतील मात्र सरकारला कोणताही धोका नाही, असा दावा करीत आहेत; परंतु काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेच सातत्यानं सरकार अस्थिर करणारी वक्तव्ये करीत आहेत.

Advertisement

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री टार्गेट

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनाही टार्गेट करणारी पटोले यांची वक्तव्ये जिव्हारी लागल्याने आता अजितदादा चांगलेच संतापले आहेत.

ठाकरे यांच्यावरही आता थेट आरोप झाल्याने एरव्ही संयमी असलेले ठाकरेही आता संतप्त झाले आहेत.

पटोले कुणाची सुपारी घेऊन काम करतात का, असा सवाल आता आघाडीतील काही नेतेही करायला लागले आहेत.

Advertisement

सरकार चालवायची जबाबदारी तीनही पक्षांची असताना पटोले, ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार सरकारच्या अडचणी वाढवित आहेत.

शरद पवारांनाच कान टोचावे लागणार

पटोले यांच्याविरोधात ठाकरे यांनी सोनिया गांधी यांच्याकडे थेट तक्रार करूनही पटोले सातत्याने सरकारवर तुटून पडत आहेत.

राज्यातील महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांनाच आता या प्रश्नी काँग्रेस पक्षश्रेष्ठींचे कान टोचावे लागतील, असे दिसते.

Advertisement

 

 

Advertisement