पुणे : राज्यात (State) कोरोनाची रुग्णसंख्या (Corona Patients) झपाट्याने वाढत आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित (Ajit Pawar) पवार यांनी राज्यात कठोर निर्बंधाबाबत (Strict restrictions) सूचक वक्तव्य केले आहे. कोरेगाव भीमा (Koregaon Bhima) येथे ते बोलत होते.

अजित पवार यांनी शौर्य दिनानिमित्त (Day of Valor) कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला (Victory Pillar) अभिवादन केले आहे.

यावेळी बोलताना ते म्हणाले, कोरेगाव भीमाच्या लढाईतील शुरांना अभिवादन करतो, इथला इतिहास स्मरणात राहील, असे ही ते म्हणाले.

Advertisement

कोरेगाव भीमा येथील विजय स्तंभ परिसराचा विकास करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे. तसेच ते वाढत्या कोरोना रुग्णसंख्येबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असेही ते म्हणाले.

कोरोना रुग्णांची (Corona Cases) संख्या वाढीचे प्रमाण काय आहे हे पाहून नियम केले जातील. गरज पडल्यास राज्यात कठोर निर्बंध लागू करावे लागतील असे सूचक वक्तव्य ही अजित पवार यांनी केले आहे.

10 मंत्री (10 ministers) आणि 20 पेक्षा जास्त आमदार (20 MLAs) पॉझिटिव्ह (Positive) आले आहेत. कोरोना विषाणू संसर्गाच्या रुग्णांच्या वाढीच्या प्रमाणाचा अंदाज घेऊन नियम लागू करण्याबाबत विचार केला जाणार असल्याचेही अजित पवार म्हणाले आहेत.

Advertisement

नागरिकांनी नियमांचे पालन करण्याचे तसेच काळजी घेण्याचे आव्हानही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.