पुणे – काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सुरू केलेली ‘भारत जोडो’ यात्रा (bharat jodo yatra) नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नांदेड जिल्ह्यातून महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. काँग्रेसची भारत जोडो यात्रा ही 7 नोव्हेंबरला महाराष्ट्रात दाखल झाली असून, या यात्रेचा 60 पेक्षा जास्त दिवस आहे. त्यामुळे मागील सहा दिवसांपासून आपल्या राज्यात भारत जोडो यात्रेची चांगलीच चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.

कन्याकुमारी ते काश्मीर निघालेल्या भारत जोडो यात्रेचे (bharat jodo yatra) महाराष्ट्राच्या जनतेने जल्लोषात स्वागत केले असल्याचे दिसून आले आहे. या यात्रेमध्ये (bharat jodo yatra) महाराष्ट्रातील अनेक नेत्यांपासून हजारो काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.

दरम्यान, राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमध्ये काँग्रेस नेत्यांसोबतच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे नेते सहभागी झाले. राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit pawar) यांनाही तुम्ही भारत जोडो यात्रेत सहभागी होणार का? असा प्रश्न विचारण्यात आला?

यावर आता अजित पवार (Ajit pawar) यांनी आपली भूमिका मांडली आहे. अजित पवार म्हणाले की., “मंगळवारी मुंबईमध्ये मीटिंग घेणार आहे, त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडू, असं अजित पवार म्हणाले आहेत.

‘प्रत्येक पक्षाच्या प्रमुखांना किंवा नेत्यांना अशा यात्रा काढण्याचा अधिकार आहे. याआधी माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांनीही पदयात्रा काढली होती. अडवाणी साहेबांनीही रथयात्रा काढली होती. आता राहुल गांधींनीही पदयात्रा काढली आहे,’ असं अजित पवार म्हणाले.

राष्ट्रवादीच्या वतीने पवार साहेब जाणार होते, अशी सुरूवातीला बातमी होती, पण तब्येतीच्या कारणामुळे साहेब गेले नाही, पण आमचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड गेले. इतर काही कार्यकर्तेही सहभागी झाले,’ असं अजित पवारांनी सांगितलं.

दरम्यान, पुणे जिल्ह्यात देखील भारत जोडो यात्रेच्या (bharat jodo yatra) समर्थनार्थ पदयात्रा काढण्यात येत आहे. नुकतंच संपूर्ण खेड तालुक्यातून पदयात्रा काढण्यात आली असून, यावेळी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचं दिसून आलं.