राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार किती सकाळी कामाला सुरुवात करतात, हे राज्यातील अधिकारी आणि कार्यकर्त्यांना माहीत आहे. त्यांचा दिवस पहाटे सुरू होतो. त्यांच्या कामाचा उरक आणि त्यांची शिस्त अनेकांना खुपते.

सातत्याने कठोर, शिस्तप्रिय असलेल्या अजितदादा ॲक्शन मूडमध्ये आले, की अनेकांना कापरे फुटते. ते चांगल्या मूडमध्ये असले, की मग ते विनोद करतात, फिरक्याही घेतात. त्यांचा हा अनुभव आज अनेकांना आला

सकाळी सात वाजण्यापूर्वीच कोविड सेंटरमध्ये

अजित पवार हे सकाळीच अॅक्शन मोडमध्ये दिसून आले. सकाळी सात वाजण्यापूर्वीच ते बाणेर परिसरात असलेल्या कोविड रुग्णालयाला भेट देण्यासाठी दाखल झाले.

Advertisement

विविध विकासकामांची पाहणी करण्यासाठी सकाळपासूनच त्यांचा दौरा सुरू झाला होता. पवार यांचा मिश्किल मूडसुद्धा पाहायला मिळाला.

काहींनी दूध घेतल्यावर नाही तेच सुरू होतं..

पवार यांनी आज सकाळी पाच मजली कोविड हॉस्पिटलच्या इमारतीची पाहणी केली. इमारतीमधील तळ मजल्यावर एका केबिन चर्चा सुरू असताना सर्वांसमोर चहा, बिस्किट आणि काही वेळाने दुधाचे ग्लासदेखील ठेवण्यात आले.

लगेच त्यांनी दूध घेण्यास सुरुवात केली. काही जण दूध घेत नसल्याचं पाहून पवार यांनी, “काहींनी दूध घेतल्यावर नाही तेच सुरू होतं, ” असं म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.

Advertisement

काही हातही लावत नाही…

मला आणि आयुक्तांना सवय आहे म्हणून दूध घेतो. काहीजण दुधाच्या ग्लासाला हात लावायला तयार नाहीत. काहींना दुधाची अॅलर्जी असते, तर काही जण पीत नसल्याचे त्यांनी म्हटलं.

 

Advertisement