बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे फार मोठी व्यक्ती आहे. आम्ही सामान्य कार्यकर्ते आहोत, अशा शब्दात पाटील यांची खिल्ली उडवली आहे. यावेळी अजित पवार हे बारामती (Baramati) दौऱ्यावरती होते.
यावेळी ते म्हणाले की, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे मोठी व्यक्ती आहेत. मी लहान कार्यकर्ता असून त्यांच्यावर काय बोलणार, अशा शब्दात अजित पवार यांनी टोला लगावला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी पाच राज्यातील निवडणुका संपल्यावर राज्यातील सरकार (State Government) पडेल, असा दावा केला होता. तसेच महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांचे एकमेकांसोबत मतभेद वाढत असल्याचे देखील चंद्रकांत पाटील म्हणाले होते.
दरम्यान अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार 10 मार्चनंतर जाणार असल्याच्या वक्त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
याचसोबतच अजित पवार यांनी अर्थसंकल्प आणि बजाज समुहाचे माजी अध्यक्ष राहुल बजाज (Rahul Bajaj) यांच्या निधनामुळे भारतीय उद्योग क्षेत्रातील पितामह निघून गेल्याची भावना अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.
ते म्हणाले की, स्कुटरनंतर बाईकमध्ये आवड निर्माण झाल्यानंतर त्यांनी बाईक निर्माण केल्या होत्या. बजाजने जे प्रोडक्ट आणले ते जगात लोकप्रिय झाले आहेत. ते उद्योग क्षेत्रात असले तरी त्यांनी समाजातील महत्त्वाच्या गोष्टींवर मत व्यक्त केले आहे.
त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखे आहे, अशा शब्दात अजित पवार यांनी राहुल बजाज यांच्याविषयी भावना व्यक्त केल्या आहेत.