केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या चिपळूण दाै-याच्या वेळी एकही अधिकारी उपस्थित नसल्यानं राणे यांनी संताप व्यक्त केला होता. त्यांनी थेट मुख्मयंत्र्यांना टार्गेट केले.

या घटनेची पुनरावृत्ती होणार नाही, याची दक्षता घेण्यासाठी आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यावर कायमचा तोडगा काढला आहे.

नोडल अधिका-यांची नेमणूक करणार

पूरग्रस्त भागासाठी केंद्र सरकारमधील मंत्री येत आहेत. तो त्यांचा अधिकार आहे. मंत्र्यांच्या दाै-यात अधिका-यांनी उपस्थित राहणं आवश्यक आहे. राजशिष्टाचाराचा तो भाग आहे; परंतु एकाच वेळी अनेक मंत्री एकाच भागात दाै-यासाठी आले, तर काय करायेच, असा प्रश्न उपस्थित होतो.

Advertisement

त्यामुळे आता त्यावर पवार यांनीच तोडगा काढला आहे. आता नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. नोडल अधिकारी मंत्र्यांच्या दौऱ्यासोबत असतील, अशी माहिती पवार यांनी दिली.

वरिष्ठ अधिकारी दालनात बसून करतील मदतीचे काम

जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, मनपा आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी हे दालनात बसूनच आता मदतीसंदर्भात काम करतील, असं अजित पवार म्हणाले. अधिकाऱ्यांना हे कुठे ते कुठे चालणार नाही, अधिकाऱ्यांनासुद्धा मदतीसाठी वेळ हवा आहे, असे ते म्हणाले.

काय म्हणाले होते नारायण राणे?

नारायण राणे जिल्हाधिकाऱ्यांना म्हणाले, “तो सीएम बीएम गेला उडत. आम्हाला कुणाचीही नावं सांगू नका. प्रांत सांगतो पालकमंत्र्यांसोबत आहे, तुम्ही सांगताय सीएमसोबत आहे. इथं कोण आहे? इथं तुमचा एक तरी अधिकारी आहे का?

Advertisement

आतापर्यंत तुम्हाला स्वस्थ बसू दिलं, आता जागेवर बसू देणार नाही हे लक्षात ठेवा.” जिल्हाधिकाऱ्यांनी सीईओ संबंधित ठिकाणी असल्याचं सांगितलं.

त्यानंतर कोण सीईओ आहे, मला कुणीही भेटलं नाही असं राणे यांनी सांगितलं. मी बाजारपेठेत उभा आहे. कोण आहेत सीईओ? मला दाखवा, असंही नारायण राणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सुनावलं होतं.

 

Advertisement