खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरला परवानगी नाकारण्यात आल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कोल्हापूर दौरा रद्द करण्यात आला.

कोल्हापूरऐवजी सांगलीला

पवार आज सकाळी नऊ वाजता कोल्हापूर विमानतळावर येणार होते. त्यानंतर सव्वा नऊ वाजता ते शाहू सांस्कृतिक हॉल येथे पूरग्रस्तांच्या तात्पुरत्या निवारा केंद्रास भेट देणार होते. तिथून ते शिवाजी पूल पूरग्रस्त परिसराची पाहणी करणार होते.

नंतर सव्वा दहा वाजता शासकीय विश्रामगृहात कोल्हापूर जिल्ह्याती पूरग्रस्त परिस्थितीचा आढाव घेणार होते. त्यानंतरसाडे अकरा वाजता ते हेलिकॉप्टरने शिरोळकडे जाणार होते. 12 वाजता शिरोळमध्ये पूरग्रस्त भागाची पाहणी करणार होते.

त्यानंतर सव्वा एक वाजता पलूसकडे जाऊन पलूस परिसराची पाहणी करणार होते; मात्र खराब हवामानामुळे त्यांचा दौरा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे कोल्हापूरला जाण्याऐवजी अजित पवार सांगलीला रवाना झाले आहेत.

काळजी करू नका, मदत करू

कोल्हापूरचा दौरा रद्द केल्यानंतर अजित पवार भिलवडी पोहचले. त्यांच्यासोबत मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, विश्वजीत कदम होते. भिलवडीतील निवारा केंद्रात जाऊन त्यांनी स्थानिकांची विचारपूस केली.

तुम्ही जिथे राहता तिथे महापुराचं पाणी नेहमी येतं का? पहिल्यांदाच पाणी आलं का? पाणी आलं तर किती वर्षानंतर आलं?

असे प्रश्न त्यांनी निवारा केंद्रातील लोकांना केले. तसेच तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला सर्व मदत देऊ, असं आश्वासनही त्यांनी दिली.

खराब हवामानामुळे गेलो नाही

सकाळीच कोल्हापूरला जाणार होतो. विभागीय आयुक्त सौरभ राव यांना घेऊन कोल्हापूरला जाणार होतो; मात्र खराब हवामानामुळे मला जाता आले नाही. आज भिलवडी येथील पूरग्रस्तांच्या अडचणी जाणून घेत आहे. असं अजित पवार यांनी सांगितलं.